Frequently Asked Questions - Computer Department
Quick Search

1) महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट काय आहे.?

उत्तर : www.nashikcorporation.in ही मनपाची अधिकृत वेबसाईट आहे.

2) वेबसाईटवर तक्रारींची नोंदणी कशा पद्धतीने करावी?

उत्तर : प्रथमत: www.nashikcorporation.in हया नाशिक मनपाच्या वेबसाईटवर लॉगीन करावे, वेबसाईटवर Complaint / Grievances मेन्युच्या खाली असलेल्या Register Your Complaint Online हया Option वर Click करावे, Click केल्यानंतर Complaint Registration Form (तक्रार नोंदणी अर्ज) उपलब्ध होईल सदर अर्जात नमुद तपशील (नांव,पत्ता,दुरध्वनी क्रमांक,पिनकोड इ.) भरून आपल्या तक्रारी, सुचना इत्यादीबाबत तपशील नोंदविणेकरीता तक्रार दाखल करावयाचा विभाग, संबंधित तक्रारीशी संबंधित विभाग, तक्रार असलेला प्रभाग क्रमांक, तक्रारीचा संक्षिप्त तपशील, तक्रारीचा परिपुर्ण तपशील इत्यादी बाबी परिपुर्ण भरून Submit हया Option वर Click करावे, Click केल्यानंतर आपली तक्रार नोंदविली जावुन आपणांस आपल्या तक्रारीचा Complaint Registration Number प्राप्त होईल.

3) मनपाचे अधिकारी/ नगरसेवक / आयुक्त यांचे संपर्क दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी कुठे मिळतील?

उत्तर : नाशिक मनपाच्या www.nashikcorporation.in हया वेबसाईटवर About NMC मध्ये Administration हया लिंकवर मनपा अधिकारी यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी उपलब्ध आहेत.

4) मनपाच्या सर्व अधिका-यांचे ई-मेल आयडी कुठे मिळतील?

उत्तर : नाशिक मनपाच्या www.nashikcorporation.in हया वेबसाईटवर About NMC मध्ये Administration हया लिंकवर मनपा अधिकारी यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी उपलब्ध आहेत.

5) वेबसाईटद्वारे ऑनलाईन बिले कशा पद्धतीने स्वीकारली जातात ?

उत्तर : नाशिक मनपाच्या www.nashikcorporation.in हया वेबसाईटवर Online Utilities (ई-सेवा) हया Option वर Click केल्यानंतर आपणांस Property Tax / Water Tax असे दोन Option येतील त्यापैकी आपणांस जे बिल भरावयाचे आहेृ, त्यावर Click करावे व त्यानंतर आपला Index Number टाकल्यास आपणांस आपल्या भरावयाच्या बिलाचा तपशील उपलब्ध होईल, सदरचे भरावयाचे बिल आपल्या ई बँकींग, नेट बँकींग सुविधेमार्फत भरता येईल.

6) मनपामधील रिक्तपदे भरण्यासंबंधीची माहिती कुठे मिळेल?

उत्तर : नाशिक मनपामधील रिक्तपदे भरण्यासंबंधी माहिती www.nashikcorporation.in मध्ये News & Announcement वर असेल त्यावेळेस बघता येतील.