Frequently Asked Questions - Town Planning
Quick Search

1) बांधकाम परवानगी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर :

1.  अनुक्रमणिका

2.  कार्यालयीन उपयोगासाठी कोरे कागद

3.  विभाजक

4.  मालकाच्या सहीचे आवेदन पत्र (अर्ज) परिशिष्ट अ

5.  परिशिष्ट अ – नमुना

6.  परिशिष्ट ब – पर्यवेक्षणाचा (आर्की.इंजिनिअर यांनी भरलेला व सही केलेला)

7.  फॉर्म – अे – 3.3 (विकास शुल्क / निधीसाठी)

8.  पैसे भरल्याच्या पावत्या लावणेसाठी कोरा कागद

9.  मालकी हक्कासंबंधी कागदपत्र 7/12 उतारा / सी.टी.एस. उतारा/ खरेदीखताची प्रमाणीत प्रत / ज.मु.पत्राची नोंदणी केलेली व प्रमाणित केलेली प्रत.

10. प्लास्टीक फोल्डर (नकाशासाठी) प्रस्तावित बांधकाम नकाशा.

11. सी.टी.एस./ टी. आय.एल.आर./ यु.एस.सी. नकाशा

12. अंतिम मंजुर लेआउटची प्रमाणित खरी नक्कल / सी.टी.एस./ टी.आय.एल.आर./ यु.एल.सी.नकाशा

13. अंतिम मंजुर लेआउट पत्राची खरी नक्कल / तात्पुरत्या मंजुर लेआउट / 31/12/85 पावेतो

14. बिनशेती परवानगी खरी नक्कल

15. चालुवर्षीचा बिनशेती सारा भरलेची पावतीची खरी नक्कल

16. ना.ज.क्र.म. कार्यालयाकडील ना हरकत दाखला

17. वाढीव बांधकामासाठी अ) अस्तित्वातील बांधकामाचा नकाशा ब) भोगवटाप्रमाणपत्राची खरी नक्कल क) चालु पाणीपट्टी व घरपट्टी भरलेची पावतीची खरी नक्कल

18. नोंदणी केलेली जनरल मुखत्यारपत्राची प्रमाणीत प्रत.

19. 50/- रू. च्या रेव्हेन्यु स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र.

20. 200/- रू. च्या रेव्हेन्यु स्टॅम्पवर इंडग्नीटी बॉण्ड

21. स्ट्रक्चरल स्टॅबीलीटी सर्टीफिकेट

22. आर्कि./ इंजी. व स्ट्रक्चरल इंजि. यांचे परवान्याची कॉपी

23. तपासणी फी भरलेची पावती

24. विकास निधी / शुल्क भरलेची पावती

25. डेब्रीज मटेरिअल हमीपत्र

26. एल.बी.टी. हमीपत्र (नोटरी)

2) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी कामी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर :

1.  मनपा कव्हर

2.  अनुक्रमणिका

3.  कोरे कागद (कार्यालयीन उपयोगासाठी)

4.  विभाजक

5.  विहीत नमुन्यातील अर्ज

6.  बांधकाम पुर्णत्वाचे इंजि./ वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र

7.  चटई क्षेत्र तक्ता (दोन प्रतित)

8.  बांधकाम पुर्ण झाल्याचा नकाशा वास्तुविशारद / इंजि. यांनी स्वाक्षरी केलेल्या (दोन प्रतित)

9.  कोरे कागद (पावत्या चिटकविण्यासाठी)

10. मालकी हक्कासंबंधीचे कागदपत्र – 7/12 चा उतारा/ सीटी सर्व्हेचा उतारा/ प्रमाणीत केलेली खरेदीखताची नक्कल प्रत

11. मंजुर नकाशाची मुळ प्रत

12. बांधकाम परवाना आदेशाची प्रमाणित प्रत व त्यातील शर्तींची पुर्तता

13. बिनशेती कर भरलेची प्रमाणित प्रत

14. भागश: पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी हमीपत्र

15. ज्योत्याचे पुर्णत्वाचा दाखला

16. मोकळा भुखंड निधी (व्हॅकन्ट प्लॉट टॅक्स)
17. कंम्प्लीशन नकाशा

3) बांधकाम परवानगीची नियम पुस्तिका कोठे व कशी मिळेल?

उत्तर : मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in व शासनाचे चर्नीरोड प्रेस, मुंबई येथे.

4) नविन बांधकाम परवानगी मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे?

उत्तर : वास्तूविशारद / अ‍भियंता यांचेमार्फत मनपाचे नगररचना विभागात विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्तावासह अर्ज व नकाशे सादर करणे.

5) बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव मनपाकडे दाखल केल्यानंतर किती दिवसात बांधकाम परवानगी मिळेल?

उत्तर : १. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार बांधकाम परवानगीसाठी किमान ४५ ते ६० दिवस.
२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार इमारत बांधकाम पुर्णत्वाचा दाखल्यासाठी किमान २१ दिवस.

6) मनपा क्षेत्रामध्ये भूखंडाचे चटईक्षेत्र निर्देशांक किती आहे?

उत्तर : १. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार रहिवासी व वाणिज्य कारणासाठी संमिश्र दर्शविलेल्या क्षेत्रासाठी १ व दाटीवाटीच्या क्षेत्रात (गावठाण) भागात २ चटई क्षेत्र निर्देशांक.
२. औदयोगिक क्षेत्रासाठी १ चटई क्षेत्र निर्देशांक.

7) बांधकाम परवानगी मिळण्यासाठी भरावे लागणारे विकास शुल्क किती असते?

उत्तर : मुद्रांक दर तक्त्यातील सर्व्हे नंबरच्या जमिन दराच्या २%.

8) नाशिक मनपा क्षेत्रात किती मीटर उंच इमारतीस परवानगी मिळू शकेल?

उत्तर :

१. १२.० मी. रुंद रस्त्याच्या स:न्मुख  भुखंडावर १५ मी. पर्यंत उंची अनुज्ञेय आहे.

२. १२.० मी., १८.० मी., व २४.० मी. रुंद रस्त्याच्या स:न्मुख १००० चौ.मी पेक्षा कमी क्षेत्राच्या भुखंडावर २४ मी. पर्यंत उंची अनुज्ञेय आहे. व १००० चौ.मी च्या क्षेत्राच्या भुखंडावर ४० मी. पर्यंत उंची अनुज्ञेय आहे.

9) हरीत विभागातील भूखंडावर बांधकाम परवानगी मिळू शकेल का?

उत्तर : होय, विकास नियंत्रण नियमावलीतील हरीत विभागातील अनुज्ञेय व्यवसायासाठी व शेतघरासाठी १ एकर क्षेत्रासाठी १५० चौ.मी व ६००० चौ.मी पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास ४०० चौ.मी पर्यंत बांधकाम परवानगी मिळू शकेल.

10) जोते (प्लिंथ) तपासणी दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर :

1.  मंजुर नकाशाची प्रत व मंजुरीचे पत्र

2.  आर्किटेक्ट / इंजिनिअरचा दाखला

3.  प्लिंथच्या नकाशाच्या दोन प्रती

4.  7/12 उतारा (नविन)

5.  पेपर नोटीसची प्रत

6.  जागेवरील नावाचा बोर्डचा फोटो

11) माझ्याकडे करआकारणी पावती (प्रापर्टी टॅक्स बिल) व कर भरल्याची पावती आहे, म्हणजे माझे बांधकाम नियमित आहे काय?

उत्तर : नाही.

12) Environment Clearance दाखला बांधकाम परवानगीसाठी केव्हा आवश्यक आहे? 

उत्तर : 20,000 चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र असल्यास

13) मनपा क्षेत्रातील इमारतीस बांधकाम परवानगी/पूर्णत्वाचा दाखला मिळालेला आहे किंवा नाही हे कसे कळेल? 

उत्तर : संबंधित जमीनमालक / विकासक यांचेकडेस व मनपाकडे बांधकाम परवानगी व कंम्प्लीशन सर्टीफिकेट दिलेले आहे हे कळु शकेल.

14) एखाद्या भुखंडावर टी.डी.आर. खर्ची टाकता येतो का?

उत्तर : निव्वळ भूखंड क्षेत्राच्या 40 टक्के टी.डी.आर वापरता येतो.

15) विकास योजना म्हणजे काय ?

उत्तर : शहर विकासाचा व नियोजनाचा पुढील २० वर्षाचा नियोजीत आराखडा.

16) विकास योजना कालावधी किती वर्षांचा असतो ?

उत्तर : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३८ नुसार २० वर्षे कालावाधी.

17) नाशिक शहराची विकास योजना केव्हा मंजूर झाली ?

उत्तर : १) नाशिक महानगरपालिकेची विकास योजना शासनाने अधिसुचना क्र. टिपीएस-११९१/ ३५(अ)/प्र.क्र.८८/नवि-९, दि. २८/०६/१९९३ मंजुर झाली आहे.

18) विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्ज कुठे करावा ?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन येथे करावा.

19) विकास योजनेचे नकाशे कोठे मिळतील ?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन येथे व मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in

20) विकास योजना नकाशे विक्रीचे दर काय आहेत ?

उत्तर : संपुर्ण नाशिक शहराचा नकाशा मिळ्णेकरीता र.रु. १५००/-

21) विकास योजना नकाशे किती दिवसात मिळतील ?

उत्तर : अर्ज केल्यानंतर, आवश्यक रक्कम जमा केल्याची पावती हजर केल्यानंतर ३ दिवस.

22) विकास योजना अभिप्रायासाठी अर्ज कोठे करावा ?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन येथे

23) विकास योजना अभिप्राय फी किती आहे व सदर अभिप्राय किती दिवसात मिळेल ?

उत्तर : र.रू.400/- व ३ दिवस.

24) माझी मिळकत विकास योजना प्रस्तावाने बाधीत होत आहे काय याची माहिती कोठे मिळेल ?

उत्तर : झोनिंग दाखला घेता येईल व मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in येथे विकास योजना नकाशावर

25) विकास योजनेतील आरक्षणांची माहिती कोठे मिळेल ?

उत्तर : मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in येथे व नगररचना विभाग, राजीव गांधी भवन

26) नाशिक महानगरपालिकेची स्थापना कधी झाली?

उत्तर : नाशिक महानगरपालिकेची स्थापना महाराष्ट्र शासन राजपत्र पीसीसी-१०८२/२११(i) युडी-२१ दि.२२ ऑक्टोबर, १९८२ अन्वये होवुन दि. ७ नोव्हेंबर, १९८२ पासुन महानगरपालिका अस्तित्वात आली.

27) नाशिक महानगरपालिकेची हद्दवाढ कधी झाली?

उत्तर : नाशिक महानगरपालिकेची स्थापना होतेवेळी त्यामध्ये २० खेडी व ३ नगरपालिका हद्द समाविष्ट आहे.

28) नाशिक महानगरपालिका क्षेत्र किती आहे?

उत्तर : नाशिक महानगरपालिका क्षेत्र २५९.१२ चौ.कि.मी. आहे.

29) नाशिक महानगरपालिका क्षेत्रात किती नियोजन प्राधिकरणे आहेत व कोणती?

उत्तर :

1.  नाशिक महानगरपालिका

2.  सिडको

3.  एम.आय.डी.सी.

30) विकास योजनेचा झोन दाखला, भाग नकाशासाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात?

उत्तर : अर्ज 7/12 उतारा व फी भरलेची पावती व आवश्यकता असल्यास अधिकृत मोजणी नकाशा.

31) विकास योजना भाग नकाशा फी किती आहे व भाग नकाशा किती दिवसात मिळेल ? 

उत्तर : र.रू. 400/- आठ दिवस

32) विकास योजनेतील जागा आरक्षणाने बाधित असल्यास मोबदला कशाप्रकारे मिळु शकेल?

उत्तर : टी.डी.आर./ भुसंपादन प्रस्तावाव्दारे रोख स्वरूपात

33) विकास योजनेतील रस्ता / रस्तारुंदीचे जागेचा मोबदला कशाप्रकारे मिळु शकेल ?

उत्तर : एफ.एस.आय.अथवा वरील प्रमाणे

34) टी.डी.आर. म्हणजे काय ?

उत्तर : हस्तांतरणीय विकास हक्क (Transfer of Development Rights) विकास योजनेत दर्शविलेल्या आरक्षण व रस्त्याचे क्षेत्राचे हस्तांतर म.ना.पा. कडे करुन त्या बदल्यात सदर  क्षेत्र वापरण्यासाठी देण्यात येणारा दाखला.

35) टी.डी.आर. मिळविण्यासाठी प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात ?

उत्तर : १. मालकी हक्काचे कागदपत्रे (७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, त्यावरील सर्व फ़ेरफ़ार, चालु तारखेपर्यंत मुळ प्रतित)
२. भुमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी नकाशा
३. विकास योजना अभिप्राय
४. तिस वर्षाचा सर्च व टायटल रिपोर्ट
५. कुळ मुखत्यारपत्र व विकासन करारनामा प्रति (लागु असल्यास)
६. २०० रु. स्टॅम्प पेपरवर बंधपत्र
७. १०० रु. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
८. ३०० रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व बंधपत्र
९. बाधीत क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे.
१०. ना.ज.क.म. कार्यालयाकडील अंतिम झालेले विवरण पत्र व नकाशा (आवश्यक असल्यास)
११. जागेची परिस्थितीदर्शक समतल नकाशा.

36) टी.डी.आर. खर्ची टाकण्याच्या प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतात ?

उत्तर : खरेदीखत (ज्या ठिकाणी खर्ची टाकावयाचे आहे ते) मुळ टी.डी.आर. दाखला

37) टी.डी.आर. व्दारे जागा ताब्यात देण्याचा प्रस्ताव व टी.डी.आर. खर्ची टाकण्याचा प्रस्ताव कोठे दाखल करावा ?

उत्तर : विहीत नमुन्यातील अर्जाव्दारे मा.आयुक्त सो. नाशिक मनपा यांचेकडे

38) टी.डी.आर. प्रकरणी छाननी शुल्क किती आहे ?

उत्तर : र.रू.5/- प्रति चौ.मी.

39) टी.डी.आर. खर्ची टाकण्याचे प्रस्तावासाठी छाननी शुल्क किती आहे ?

उत्तर : नाही.

40) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 205 अन्वये घोषित रस्त्यासाठी टी.डी.आर. मिळतो काय ?

उत्तर : नाही

41) टी.डी.आर. झोन किती व कोणते ?

उत्तर : एकूण चार झोन आहेत – A,B,C,D

42) टी.डी.आर. वापरासंबंधी काय तरतुद आहे. (कोणत्या झोनचा टी.डी.आर. कुठल्या झोनमध्ये वापरता येतो) ?

उत्तर :

1.  A व B झोनचा टी.डी.आर. B, C & D झोनमध्ये वापरता येतो.

2.  C झोनचा टी.डी.आर. C & D झोनमध्ये वापरता येतो.

3.  D झोनचा टी.डी.आर फक्त D झोनमध्येच वापरता येतो.

43) डी.पी. रस्त्यात जाणा-या क्षेत्राचा उर्वरित भूखंडावर एफ.एस.आय. मिळतो का व किती ?

उत्तर : होय, रस्ता बाधीत क्षेत्र किंवा रस्ता बाधीत क्षेत्र सोडुन उर्वरीत भुखंड क्षेत्राचे ४०% क्षेत्र यापैंकी कमी एवढ्या क्षेत्राइतका जादा एफ़.एस.आय भुखंडधारकास वापरता येतो.

44) एफ.एस.आय. व्दारे रस्ताबाधित क्षेत्र ताब्यात देण्यासाठी कोणती कागदपत्रे प्रकरणा सोबत दाखल करावी लागतात ?

उत्तर : १. मालकी हक्काचे कागदपत्रे (७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, त्यावरील सर्व फ़ेरफ़ार, चालु तारखेपर्यंत मुळ प्रतित)
२. भुमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी नकाशा
३. विकास योजना अभिप्राय
४. तिस वर्षाचा सर्च व टायटल रिपोर्ट
५. कुळ मुखत्यारपत्र व विकासन करारनामा प्रति (लागु असल्यास)
६. २०० रु. स्टॅम्प पेपरवर बंधपत्र
७. १०० रु. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
८. ३०० रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व बंधपत्र

45) कचरा डेपोसाठी बफर झोन किती मीटरचा आहे ?

उत्तर : ५०० मीटर.

46) पूररेषा म्हणजे काय ?

उत्तर : पूररेषा दोन प्रकारच्या आहेत.
१. निळी (निषेधक) पुररेषा :- जे क्षेत्र कोणत्याही वर्षि पुर येण्याच्या शक्यतेमुळे बांधकामाच्या दृष्टीकोनातुन ते निषिध्द ठरवितात. (सरासरीने २५ वर्षातुन एकदा या वारंवारितेने येणारा पुरविसर्ग वाहुन नेण्यासाठी जे नदीचे पात्र व लागतचे क्षेत्र आवश्यक ते क्षेत्र म्हणजे "निषिध्द क्षेत्र"
२. लाल (नियंत्रक) पुररेषा :- पर्जन्यमानाच्या दृष्टीने कोणत्याही वर्षि (साधारणत: १०० वर्षात एकदा) ज्या ठिकाणापर्यंत पुर येऊ शकतो तो तलांकदर्शक.

47) निळी व लाल पूररेषा यामधील भूखंडात बांधकाम करता येईल काय ?

उत्तर : होय. तथापि, नियंत्रीत क्षेत्रामध्ये बांधकामाच्या तळ्मजल्याच्या जोत्याची पातळी ही लाल (नियंत्रक) पुररेषा आणि नजिकच्या पोहोच रस्ता याची पातळी यामधील जी पातळी वर असेल त्यापेक्षा ०.५० मी. वर असावी लागते.

48) नदी व निळी पूररेषा यामध्ये बांधकाम करता येते काय?

उत्तर : नदी हद्द ते निळी पुररेषा यामधील क्षेत्र निषिध्द क्षेत्र असुन, अशा क्षेत्राचा उपयोग फ़क्त मोकळ्या जमिनीच्या स्वरुपाने उदा. उद्दाने, खेळची मैदाने किंवा हलकी पिके घेणे अशासारख्या कारणांसाठीच केला जावा, असे महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभागाचे सन १९८९ चे परिपत्रकात नमुद आहे.

49) शासकीय मोजणीसाठी अर्ज कोठे करावा ?

उत्तर : तालुका / नगर भुमी अभिलेख कार्यालय

50) 7/12 उतारा कोठे मिळेल ?

उत्तर : तलाठी कार्यालय

51) प्रॉपर्टी कार्ड कोठे मिळेल ?

उत्तर : सिटी सर्व्हे कार्यालय

52) नगररचना विभागाची माहिती संकेतस्थळावर कोठे मिळेल? तसेच नगर रचना विभागाशी संबधित तक्रार कोणत्या ई- मेलवर करावयाच्या? 

उत्तर : मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in येथे नगररचना विभागाची माहिती व E-mail : nashikcorporation@nashikcorporation.in येथे तक्रार करता येईल.

53) मनपाकडे मान्यता प्राप्त परवाना धारक वास्तुविशारद,स्थापत्य विशारद व स्ट्क्चरर डीझायनर्स आहेत का ? 

उत्तर : होय.

54) प्रत्येक वास्तुविशारद, स्ट्क्चरर इंजिनिअर यांना मनपाचा परवाना घेणे बंधनकारक आहेत का ?

उत्तर : वास्तुविशारद यांना कौन्सिल ऑफ़ आर्किटेक्टचे नोंदणी दखला व अभियंता यांना म.न.पा.चा परवाना घेणे आवश्यक आहे.

55) विनापरवाना वास्तुविशारद, इंजिनिअर स्ट्क्चरर डिझायनर कडून वास्तु बनविता येते काय ?

उत्तर : नाही.

56) वास्तुविशारद, स्ट्क्चरर डीझायनर परवान्याकरीता अर्ज कुठे मिळेल ?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन येथे.

57) अर्जाची किंमत काय ? 

उत्तर : विनामुल्य, स्वहस्ते अर्ज सादर करु शकतात.

58) भरलेला अर्ज कुठे जमा करावा ?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन येथे.

59) परिपुर्ण अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसांत परवाना मिळतो ?

उत्तर : पंधरा दिवस

60) परवान्यासाठी अर्ज सादर करतांना कोणती कागदपत्रे जोडावी लागता ? 

उत्तर :

1.  इंजिनिअर व स्ट्रक्चरल इंजिनिअरसाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी दाखला व मार्कशिट.

2.  सुपरवायजरसाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदविका दाखला व मार्कशिट तसेच पाच वर्ष अनुभवाचा दाखला.

61) परवाना अर्ज सादर करतांना अर्जासोबत किती शुल्क भरावे लागते ?

उत्तर : अर्ज सादर करतांना शुल्क भरावे लागत नाही. पंरतू मंजुरीनंतर र.रू.7500/- म.न.पा खजिन्यात भरावे लागतात.

62) परवान्याचा कालावधी किती वर्ष आहे ?

उत्तर : पाच वर्ष

63) परवान्याचे नुतनीकरण करतांना कोणती कागदपत्रे सादर करावी ?

उत्तर : पुर्वीचे परवाना व अर्ज.

64) परवान्याचे नुतनीकरण किती वर्षासाठी करता येते ? 

उत्तर : पाच वर्ष

65) लेआउट मधील खुली जागा मनपाकडे हस्तांतरीत करणेकामी काय करावे लागते ?

उत्तर : मालकी हक्काचा उतारा, मंजूर लेआउट नकाशा, जागामालक यांचे विहित नमुन्यातील हस्तांतरण करारनामा व खरेदीखत.

66) लेआउट मधील खुली जागा हस्तांतरीत करण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावित ? 

उत्तर : मालकी हक्काचा उतारा, मंजूर लेआउट नकाशा, जागामालक यांचे विहित नमुन्यातील हस्तांतरण करारनामा.

67) लेआउट मधील खुली जागा कोणत्या कारणासाठी वापरता येते ?

उत्तर : लेआउट मधील खुली जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी  विकास नियंत्रण नियमावलीनुसार ५०० चौ.मी. क्षेत्रापेक्षा जास्त खुल्या जागेच्या क्षेत्राच्या १०% व २०० चौ.मी. क्षेत्र यापैंकी जे कमी असेल, तेवढे क्षेत्राचे तळ्मजल्याचे बांधकाम पॅव्हेलीयन, जिम्नॅशियमसाठी वापरता येवु शकते.

68) विकास आराखडयामध्ये आरक्षणाचे किती प्रकार आहेत ? 

उत्तर : निवास, उदयोग, वणिज्य, कृषि, मनोरंजन, सार्वजनिक प्रयोजन आणि रस्ते इतके प्रकार आहेत. आरक्षणाची यादी मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in येथे उपलब्ध आहे.

69) आरक्षणाबाबतची सविस्तर माहिती कोठे प्राप्त होईल ?

उत्तर : आरक्षणाबाबतची सविस्तर माहिती मनपा संकेतस्थळ www.nashikcorporation.in येथे उपलब्ध आहे

70) बांधकाम परवानगी, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला, अंतिम अभिन्यास, तात्पुरता अभिन्यास याबाबतचे नकाशा व परवानगी पत्राची खरी नक्कलसाठी अर्ज कोठे करावा ?

उत्तर : म.न.पा. विभागीय कार्यालय येथे एक खिडकी योजने अंतर्गत अर्ज सादर करावा.

71) बांधकाम परवानगी मिळ्ण्यासाठी किती भुखंड क्षेत्रापर्यंत कोण मंजुरी देवु शकेल?

उत्तर :

१. उपअभियंता यांचेकडे भुखंड क्षेत्र ३०० चौ.मी. पर्यंत

२. कार्यकारी अभियंता यांचेकडे भुखंड क्षेत्र १५०० चौ.मी. पर्यंत

३. सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे भुखंड क्षेत्र १५०१ चौ.मी. ते ३००० चौ.मी.

४. उपसंचालक, नगररचना ३००० चौ.मी. पेक्षा जास्त.

72) अभिन्यास म्हणजे काय?

उत्तर : विकास योजनेतील प्रस्तावानुसार जमिनीचे रेखांकन करुन नियोजन करणे.

73) तात्पुरता अभिन्यास मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर : १. जागामालकाच्या स्वाक्षरीने सर्व साधारणतः विहीत नमुन्यातील आवेदन पत्र (परिशिष्ट-अ)
२. परिशिष्ट-ब : पर्यवेक्षणाचा आर्किटेक्ट व इंजिनियर यांनी भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज.
३. तपासणी फ़ी भरलेची पावती
४. ७/१२ उतारा
५. भुमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी नकाशा, प्रस्तावित तात्पुरता अभिन्यास प्रत.
६. आजुबाजुकडील मंजुर अभिन्यास प्रत
७. जनरल मुखत्यार पत्र असल्यास त्याची प्रत.

74) अंतिम अभिन्यास मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर : १. जागामालकाच्या स्वाक्षरीने सर्व साधारणतः विहीत नमुन्यातील आवेदन पत्र (परिशिष्ट-अ)
२. परिशिष्ट-ब : पर्यवेक्षणाचा आर्किटेक्ट व इंजिनियर यांनी भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज.
३. तपासणी फ़ी भरलेची पावती
४. ७/१२ उतारा
५. जनरल मुखत्यार पत्र असल्यास त्याची प्रत.
६. तात्पुरता अभिन्यास मंजुरीचा नकाशा आदेश
७. जागेवरील डिमोक्रेश्न नुसार डी.आय.एल.आर. विभागाचा मोजणी नकाशा
८. रस्ते तयार असलेबाबत व खुल्या जागेस कंपाऊंड केलेबाबत मनपा बांधकाम विभागाचा दाखला
९. विकास निधी भरलेची पावती.

75) उपविभाजन मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर : १. जागामालकाच्या स्वाक्षरीने सर्व साधारणतः विहीत नमुन्यातील आवेदन पत्र (परिशिष्ट-अ)
२. परिशिष्ट-ब : पर्यवेक्षणाचा आर्किटेक्ट व इंजिनियर यांनी भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज.
३. तपासणी फ़ी भरलेची पावती
४. ७/१२ उतारा
५. जनरल मुखत्यार पत्र असल्यास त्याची प्रत.
६. अंतिम अभिन्यासाची मंजुरीचा नकाशा व आदेश.

76) भुखंडावर टी.डी.आर मिळु शकतो का?

उत्तर : होय, निव्वळ भुखंड क्षेत्राच्या ४०% टी.डी.आर वापरता येतो.

77) गुंठेवारीमध्ये बांधकाम परवानगी घेता येते का?

उत्तर : दि. १ जानेवारी, २००१ पुर्वी असलेल्या घरांसाठी व भुखंडासाठी गुंठेवारी परवानगी घेता येते.

78) गुंठेवारी बांधकाम परवानगीसाठी कोणते कागदपत्र लागतात?

उत्तर : १. विहीत नमुन्यातील अर्ज
२. मालकी हक्काचे कागदपत्र
३. सन २००० पुर्वीचे खरेदीखत व शासकीय मोजणी नकाशा
४. समतल नकाशा (पी.टी. शीट)
५. सभोवताली मंजुर अभिन्यास

79) गुंठेवारी प्रकरणासाठी कोठे अर्ज करावा लागतो?

उत्तर : नगररचना विभाग, राजीव गांधी भवन.