Frequently Asked Questions - Garden Department
Quick Search

1) मला झाड तोडायचे आहे. त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे काय? असल्यास अशी परवानगी कोणाकडून घ्यावी लागते?

उत्तर : झाड तोडणे बाबत अथवा विस्तार कमी करणे बाबत परवानगी विभागीय अधिकारी / वृक्ष अधिकारी, मनपा यांचे कडेस लेखी अर्ज प्रथम सादर करून परवानगी घ्यावी लागते.

2) अर्ज दिल्यानंतर साधारणपणे किती दिवसांत वृक्षतोडीस परवानगी मिळते?

उत्तर : अर्ज दिल्यानंतर अंदाजे 60 दिवसांचे कालावधीत परवानगी मिळणे अपेक्षित आहे.

3) वृक्षतोडीबाबतच्या परवानगीसाठी अर्जाचा ठरावीक नमुना आहे का? असल्यास तो कुठे उपलब्ध होईल?

उत्तर : वृक्षतोडी बाबत परवानरगीसाठी अर्जाचा ठराविक नमुना नाही. परंतु संबंधित अर्जदाराने नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक यासह झाडांचे प्रकार, ठिकाण व कच्चा नकाशा अर्जा सोबत स्वतंत्र कागदावर देणे आवश्यक आहे. तसेच झाड का तोडायचे याची कारणे नमूद करावी.

4) विनापरवाना वृक्षतोड होत असल्यास कोणाकडे तक्रार करावी?

उत्तर : विना परवाना वृक्षतोड होत असल्यास संबंधित विभागाचे विभागीय अधिकारी / वृक्ष अधिकारी मनपा यांचेकडे तक्रार करावी.

5) विनापरवाना वृक्षतोड केल्यास काय शिक्षा आहे?

उत्तर : विनापरवाना वृक्षतोड केल्यास र.रू.5000/- प्रती झाड याप्रमाणे दंडात्मक कार्यवाही होवू शकते.

6) वृक्ष प्राधिकरण म्हणजे काय ?

उत्तर : नाशिक महानगरपालिकेने वृक्ष लागवड, संवर्धन तसेच वृक्षतोडणे अथवा विस्तार कमी करणे याकामी मा.शासनाने निर्देशानुसार गठीत केलेली समिती आहे.

7) वृक्ष लागवडीसाठी रोपे कुठे मिळतील?

उत्तर : वृक्ष लागवडीसाठी रोपे नाशिक मनपाच्या नर्सरीमधून उपलब्ध होतील. यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

8) म.न.पाच्या नर्सरीमधील रोपांचे सर्वसाधारण दर काय आहेत ?

उत्तर : मनपा नर्सरीमधून मोफत वृक्षरोपे व ट्री गार्डस लागवडीकरीता उपलब्धतेनुसार दिली जातात.

9) कुंडया भाडयाने घ्यावयाचे दर काय आहेत?

उत्तर : मनपामार्फत कुंडया भाडयाने देणेत येत नाही.

10) उद्यानांत नियमित येणार्‍या नागरिकांसाठी प्रवेश फी आहे काय?

उत्तर : मनपाच्या सार्वजनिक उद्यानात नियमित येणाऱ्या नागरीकांसाठी प्रवेश फी नाही.

11) उद्यान विभागाच्या कामाचे स्वरूप काय आहे?

उत्तर : उद्यान विकास, देखभाल व दुरूस्ती करणे त्यामध्ये स्थापत्य व उद्यान विषयक कामांचा समावेश आहे.

12) वृक्षसंवर्धन विभागाच्या कामाचे स्वरूप काय आहे?

उत्तर : मनपा क्षेत्रात विविध खुल्या जागा, क्रिडांगणे, शाळा, महाविद्यालये रस्ता दुभाजक व रस्ता दुतर्फा मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करून संवर्धन करणे.

13)महापालिका क्षेत्रामध्ये एकूण किती उद्याने आहेत?व त्यांचे क्षेत्र किती आहे?

उत्तर : मनपा क्षेत्रात अंदाजे एकुण 450 उद्याने आहेत.

14) वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे झाड पडल्यास कोणाशी संपर्क साधावा ?

उत्तर : वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे झाड पडलेनंतर अग्निशामक विभाग व संबंधित विभागाचे विभागीय अधिकारी / वृक्ष अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

15) मनपामार्फत वुक्षसंरक्षक जाळया पुरविण्यात येता काय ?

उत्तर : मनपा मार्फत वृक्षरोपे लागवडीकरीता मा.सदस्याचे शिफारशीनुसार काही प्रमाणात वृक्ष संरक्षक जाळ्या उपलब्ध करून देणेत येतात.

16) असल्यास त्याची मागणी कोठे करावी ?

उत्तर : मागणी संबंधीत विभागाचे शाखा अभियंता यांचेकडेस करावी.

17) मागणी करण्याकरीता अर्ज कोठे मिळेल ?

उत्तर : मागणी अर्ज संबंधीतांनी स्वतंत्रपणे, सुस्पष्ट स्वरूपात द्यावयाचा आहे.

18) अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावित ?

उत्तर : अर्जासोबत नाव, पत्ता, दुरध्वनी क्र. साईट लोकेशन, कच्चा कागदावर नकाशा व करावयाचे वृक्षारोपण संख्या व आवश्यक वृक्षसंरक्षकाचा उल्लेख करावा व विहित नमुन्यात हमीपत्र द्यावे लागते.

19) सदर वुक्षसंरक्षक जाळयांकरीता काही शुल्क भरावे लागते का ?

उत्तर : शुल्क नाही.

20) महानगरपालिकेकडुन मला माझ्या परिसरात लागवड करण्यासाठी वृक्षरोपे किंवा  वृक्षसंरक्षक मिळु शकतात काय?

उत्तर :

स्वतःच्या परिसरातील सार्वजनिक जागेत नागरिक जर स्वताः झाडे लावुन त्यांचे संगोपन करणार असतील तर त्यांना महानगरपालिकेतर्फ़े उपलब्धतेनुसार वृक्षरोपे व वृक्षसंरक्षक लागवड व देखभाली बाबतचे हमीपत्र घेवुन सोबत दिली जातात. त्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी लागवड करावयाची त्याठिकाणी नियुक्त विभागीय अधिकारी तथा वॄक्ष अधिकारी यांचेशी संपर्क करावा.

अ. नं.

विभागाचे कर्यालयाचे नाव

विभागीय अधिकारी

कार्यालय

मोबाईल नंबर

नाशिक पश्चिम

सौ. जयश्री डी. सोनवणे

२५८२३४८

९४२३१७९१२३

नाशिक पुर्व

श्रीमती. मालिनी अ. शिरसाठ

२५९७९८२

९४२३१७९१२४

नाशिकरोड

श्री. किशोर अं. चव्हाण

२४६५७९८  २४६०२३४

९४२३१७९१२२

सातपुर

श्री. महेंद्रकुमार डी. पगारे

२३५४७८६

९८२२६२३९५२

पंचवटी

श्री. अशोक पां. वाघ

२५१३४९०  २५१२३५३

७५८८०३८५८१

नवीन नाशिक

श्री. आर. आर. गोसावी

२३९०७६८

७५८८०३८५८१

21) स्वतःच्या मालकीच्या किंवा स्वतःच्या परिसरातील मनापाच्या मालकीच्या झाडांच्या फ़ांदया किंवा संपुर्ण झाड तोडणे आवश्यक वाटल्यास कोणाशी संपर्क करावयाचा असतो?

उत्तर :

झाडांच्या फ़ांदया तोडणे किंवा झाड तोडणे यासाठी विहीत प्राधिकरणाची पुर्व परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. विहीत परवानगी मिळ्णेसाठी किंवा मनपा मालकीच्या वृक्षांच्या बाबतीत अपेक्षित कर्यावाही होणेसाठी त्या भागात नियुक्त वृक्ष अधिकारी तथा विभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करावा.

अ. नं.

विभागाचे कर्यालयाचे नाव

विभागीय अधिकारी

कार्यालय

मोबाईल नंबर

नाशिक पश्चिम

सौ. जयश्री डी. सोनवणे

२५८२३४८

९४२३१७९१२३

नाशिक पुर्व

श्रीमती. मालिनी अ. शिरसाठ

२५९७९८२

९४२३१७९१२४

नाशिकरोड

श्री. किशोर अं. चव्हाण

२४६५७९८  २४६०२३४

९४२३१७९१२२

सातपुर

श्री. महेंद्रकुमार डी. पगारे

२३५४७८६

९८२२६२३९५२

पंचवटी

श्री. अशोक पां. वाघ

२५१३४९०  २५१२३५३

७५८८०३८५८१

नवीन नाशिक

श्री. आर. आर. गोसावी

२३९०७६८

७५८८०३८५८१

22) नैर्सगिक कारणांनी वृक्ष उन्मळुन पडल्यास किंवा वृक्षाची फ़ांदी तुटल्यास त्याचे निराकारण होण्याच्या दृष्टीने कोणाशी संपर्क करावा?

उत्तर : त्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाशी संपर्क करावा. फ़ोन नंबर (सिंगाडा तलाव २५९०८७१)

23) नविन इमारत बांधतांना बांधकामाची परवानगी किंवा पुर्णत्वाचा दाखला मिळ्वतांना वृक्ष लागवडीच्या हमी पोटी माझ्याकडुन घेतलेली अनामत रक्कम परत मिळण्यासाठी मी कोणाकडे अर्ज करावा?

उत्तर :

विहीत मानाकंनाप्रमाणे वॄक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन केले असल्यास विहीत कालावधीत अर्ज केल्यास परिस्थितीनुरुप योग्य वाटल्यास अनामत रक्कम परत मिळ्ते. त्यासाठी संबंधीत विभागीय अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

अ. नं.

विभागाचे कर्यालयाचे नाव

विभागीय अधिकारी

कार्यालय

मोबाईल नंबर

नाशिक पश्चिम

सौ. जयश्री डी. सोनवणे

२५८२३४८

९४२३१७९१२३

नाशिक पुर्व

श्रीमती. मालिनी अ. शिरसाठ

२५९७९८२

९४२३१७९१२४

नाशिकरोड

श्री. किशोर अं. चव्हाण

२४६५७९८  २४६०२३४

९४२३१७९१२२

सातपुर

श्री. महेंद्रकुमार डी. पगारे

२३५४७८६

९८२२६२३९५२

पंचवटी

श्री. अशोक पां. वाघ

२५१३४९०  २५१२३५३

७५८८०३८५८१

नवीन नाशिक

श्री. आर. आर. गोसावी

२३९०७६८

७५८८०३८५८१

24) वृक्ष लागवड तथा शहर सुशोभिकरण याकामी महनगरपालिकेकडुन तांत्रिक सल्लासेवा मिळते काय?

उत्तर : वृक्ष लागवड तथा शहर सुशोभिकरण याकामी महनगरपालिकेकडुन मोफ़त तांत्रिक सल्लासेवा मिळते. त्यासाठी उद्यान अधिक्षक डॉ. जी. बी. पाटील (मोबाईल नंबर- ९४२३१७९२२१) आणि अथवा उद्यान निरिक्षक (मुख्यालय) श्री. पी.पी. फ़ालगुने (मोबाईल नंबर- ९८९०९८६६६७) यांचेशी संपर्क करावा.

25) शाळेतील मुलांना महानगरपालिकेच्या उद्यानात सहलीसाठी न्यावयाचे असल्यास त्याबाबतची परवानगी कोठे मिळ्ते?

उत्तर :

बालगट किंवा इयत्ता १ ली ते ४ थी या वयोगटातील मुलांना महानगरपालिकेच्या उदयानात सहलीसाठी न्यावयाचे असल्यास ज्या भागात उद्यान आहे त्या भागातील विभागीय अधिकारी तथा वृक्ष अधिकरी यांचेकडे अर्ज करावा.

अ. नं.

विभागाचे कर्यालयाचे नाव

विभागीय अधिकारी

कार्यालय

मोबाईल नंबर

नाशिक पश्चिम

सौ. जयश्री डी. सोनवणे

२५८२३४८

९४२३१७९१२३

नाशिक पुर्व

श्रीमती. मालिनी अ. शिरसाठ

२५९७९८२

९४२३१७९१२४

नाशिकरोड

श्री. किशोर अं. चव्हाण

२४६५७९८  २४६०२३४

९४२३१७९१२२

सातपुर

श्री. महेंद्रकुमार डी. पगारे

२३५४७८६

९८२२६२३९५२

पंचवटी

श्री. अशोक पां. वाघ

२५१३४९०  २५१२३५३

७५८८०३८५८१

नवीन नाशिक

श्री. आर. आर. गोसावी

२३९०७६८

७५८८०३८५८१