Frequently Asked Questions - Public Works Department
Quick Search

1) रस्त्यांवरील खड्डे व ओघळ्यांबाबत कोणाकडे तक्रार करावी?

उत्तर : सदरची तक्रार संबंधीत विभागीय कार्यालयाचे तक्रार निवारण कक्ष अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील तक्रार निवारण कक्ष अथवा मनपाच्या संकेत स्थळावर करण्यात यावी.

2) रस्त्यांवरील पावसाळी पाण्याचे चेंबर तुटले आहे त्या ठिकाणी धोकादायक परीस्थिती निर्माण झालेली आहे ?

उत्तर : सदरची तक्रार संबंधीत विभागीय कार्यालयाचे तक्रार निवारण कक्ष अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील तक्रार निवारण कक्ष अथवा मनपाच्या संकेत स्थळावर करण्यात यावी.

3) रस्त्यावरील चर (क्रॉस कट) कोणामार्फत बुजविण्यात येतात ?

उत्तर : सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक मनपा

4) रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणाकडे तक्रार करावी?

उत्तर : सदरची तक्रार संबंधीत विभागीय कार्यालयाचे तक्रार निवारण कक्ष अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील तक्रार निवारण कक्ष अथवा मनपाच्या संकेत स्थळावर करण्यात यावी.

5) जुने व धोकादायक बांधकामाबाबत कोठे तक्रार करावी?

उत्तर : सहा. संचालक (नगररचना) कार्यकारी अभियंता (नगररचना) नाशिक मनपा

6) रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे बाबत तक्रार कोणाकडे करावी ?

उत्तर : संबंधित विभागाचे उप अभियंता (बांधकाम)

7) रस्ता दुभाजक व रस्त्यावरील फुटपाथ दुरुस्तीबाबत कोठे तक्रार करावी ?

उत्तर : संबंधित विभागाचे उप अभियंता (बांधकाम).

8) मनपाच्या रस्त्यावर सेवावाहिन्या टाकण्याकामी खोदाई परवानगीसाठी कोणाकडे अर्ज करावा?

उत्तर : संबंधित विभागीय कार्यालयातील उप अभियंता, बांधकाम विभाग यांचेकडे अर्ज सादर करावयाचा आहे.

9) खोदाईच्या परवानगीसाठी अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावी ?

उत्तर : १. नळ कनेक्शनसाठी पाणी पुरवठा विभागाची परवानगी
२. भुमिगत गटर योजना विभागाची परवानगी.
३. MSEB, दुरसंचार व भ्रमणध्वनी कंपनी इ.च्या केबलच्या खोदाईच्या परवानगीसाठी स्वतंत्र अर्ज शासन निर्णयास अधीन राहुन आवश्यक ती कगदपत्रे सादर करुन मा. आयुकत सो. यांचेकडेस सादर करावा.

10) रस्त्यावर खोदाइच्या परवानगीसाठी किती शुल्क आकारण्यात येते ?

उत्तर : शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. ओएफ़सी- २०१२/क्र. २०९/रस्ते-७ मंत्रालय, मुंबई दि. ०७/४/२०१४ अन्वये.
१. डांबरी रस्ता र.रु ५५००/- प्र.मी.
२. खडीचा रस्ता र.रु २७६०/- प्र.मी.
३. मुरुम साईडपट्या र.रु ११५०/- प्र.मी.
४. रस्ताच्या बाजुची जमीन र.रु २७५/- प्र.मी.
५. टाईल्स लावलेले/ प्रिकस्ट/ पेव्हरब्लॅक्स लावलेले पदपथ (फ़ुटपाथ) र.रु ५५००/- प्र.मी.

11) सार्वजनिक स्वच्छता गृह व मुतारी दुरुस्ती बाबत तक्रार कोणाकडे करावी?

उत्तर : सदरची तक्रार संबंधीत विभागीय कार्यालयाचे तक्रार निवारण कक्ष अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील तक्रार निवारण कक्ष अथवा मनपाच्या संकेत स्थळावर करण्यात यावी.

12) सार्वजनिक नाला दुरुस्तीबाबत कोणाकडे तक्रार करावी ?

उत्तर : सदरची तक्रार संबंधीत विभागीय कार्यालयाचे तक्रार निवारण कक्ष अथवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील तक्रार निवारण कक्ष अथवा मनपाच्या संकेत स्थळावर करण्यात यावी.