Frequently Asked Questions - Slum Department
Quick Search

1) जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत घरकुल योजनेत कोणाला समाविष्ट करता येईल ?

उत्तर : शासनाच्या निकषाप्रमाणे मनपा / शासकिय जागेंवरील झोपडपट्टयांमध्ये राहणारे स्लम धारक.

2) रमाई आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

उत्तर :

1)  ना.म.न.पा.ने तयार केलेल्या विहीत नमुन्यात पुर्ण भरून व सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावित.

2)  सर्व विभागीय कार्यालयात / मुख्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.

3)  अर्जासोबत

4)  1) समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेला अर्जदाराचा जातीचा दाखला 2) उत्पन्नाचा समक्ष प्राधीकाऱ्याने दिलेला दाखला.

3) बी.पी.एल. कार्ड छायांकित प्रत

4) जागा मालकी संबंधी 7/12 उतारा / मालमत्ता नोंदणी प्रत

5) इतर शासकिय योजनांअंतर्गत मिळालेले ओळखपत्र छायांकित प्रत

6) लाईट बिल, घरपट्टी, निवडणूक मतदार ओळखपत्र साक्षांकित प्रत

3) इमला हस्तांतर करणेबाबत मंजुरी मिळले का ?

उत्तर : घरकुल योजना ज्या स्लममध्ये सुरू आहे तेथे तुर्त घरकुल योजनेमुळे हस्तांतरण / वीजबील, नळ कनेक्शन, नाहरकत दाखला बंद आहे.

4) विज, नळ कनेक्शन साठी ना हरकत दाखला मिळतो का ?

उत्तर : घरकुल योजना ज्या स्लममध्ये सुरू आहे तेथे तुर्त घरकुल योजनेमुळे हस्तांतरण / वीजबील, नळ कनेक्शन, नाहरकत दाखला बंद आहे.

5) इमला दुरूस्ती बांधकाम परवानगी मिळेल का ?

उत्तर : सदर विभागाकडून इमला दुरूस्ती बांधकामसाठी परवानगी दिली जात नाही.