Frequently Asked Questions - Drainage
Quick Search

1) ड्रेनेज लाईन चोकअपची तक्रार कोठे करावी ? चेंबर दुरूस्ती साठी तक्रार कोठे करावी?

उत्तर :

संबंधित विभागीय कार्यालय

उप अभियंता (भुगयो) फोन नं. 2573151/ 145

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6 ) विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

2) बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज NOC मिळवण्यासाठी अर्ज कोठे व कसा करावयाचा ?

उत्तर : बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाची स्वतंत्र एन.ओ.सी.ची आवश्यकता नाही, मनपा नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी देतांना ड्रेनेज कनेक्शन चार्जेस भरून घेतले जातात.

3) बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाची NOC किती दिवसात मिळेल ?

उत्तर : बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाची स्वतंत्र एन.ओ.सी.ची आवश्यकता नाही.

4) ड्रेनेज कनेक्शन परवानगी कशी मिळवावी?

उत्तर : नगररचना विभागाकडुन बांधकाम परवानगी देतांना ड्रेनेज कनेक्शन चार्जेस आकरण्यात येतात. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्राप्त झाले नंतर मनपाचे लायसन्स प्लंबर मार्फ़त संबंधीत विभागीय कार्यालयात अर्ज सादर केल्यास उप अभियंता, मलनि:सारण विभाग यांचे कडुन परवानगी देण्यात येते.

5) ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठी अर्ज कोठे द्यावा ?

उत्तर : संबंधीत विभागीय कार्यालयातील उप अभियंता मलनि:सारण विभाग  यांचेकडे अर्ज सादर करावयाचा आहे.

6) बांधकाम परवानगीच्या पुर्णत्वाच्या दाखल्यासाठी ड्रेनेज विभागाच्या NOC साठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे?

उत्तर :

बांधकाम परवानगीच्या पुर्णत्वाच्या दाखल्यासाठी ड्रेनेज विभागाच्या NOC ची आवश्यकता नाही. परंतु पुर्णत्वाचा दाखला प्राप्त झाले नंतर ड्रेनेज कनेक्शनकरिता लायसन्स प्लंबर मार्फ़त अर्ज सादर करणेचा आहे.

1.  मनपा कव्हर

2.  अनुक्रमणिका

3.  कोरे कागद (कार्यालयीन उपयोगासाठी)

4.  विभाजक

5.  विहीत नमुन्यातील अर्ज

6.  बांधकाम पुर्णत्वाचे इंजि./ वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र

7.  चटई क्षेत्र तक्ता (दोन प्रतित)

8.  बांधकाम पुर्ण झाल्याचा नकाशा वास्तुविशारद / इंजि. यांनी स्वाक्षरी केलेल्या (दोन प्रतित)

9.  कोरे कागद (पावत्या चिटकविण्यासाठी)

10. मालकी हक्कासंबंधीचे कागदपत्र – 7/12 चा उतारा/ सीटी सर्व्हेचा उतारा/ प्रमाणीत केलेली खरेदीखताची नक्कल प्रत

11. मंजुर नकाशाची मुळ प्रत

12. बांधकाम परवाना आदेशाची प्रमाणित प्रत व त्यातील शर्तींची पुर्तता

13. बिनशेती कर भरलेची प्रमाणित प्रत

14. भागश: पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी हमीपत्र

15. ज्योत्याचे पुर्णत्वाचा दाखला

मोकळा भुखंड निधी (व्हॅकन्ट प्लॉट टॅक्स)

7) नवीन प्लंबिंग लायसेन्ससाठी तसेच लायसन्स नुतनीकरणासाठी अर्ज कोठे करायचा?

उत्तर : पाणी पुरवठा विभागामार्फ़त देण्यात येणा-या प्लंबींग लायसन्स धारक ड्रेनेज कनेक्शनच्या कामाकरिता अनुज्ञेय आहेत. सबब नविन प्लंबिंग लायसन्स करिता तसेच लायसन्स नुतनीकरणाकरिता, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथील कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांचेकडे अर्ज करावा.

8) नवीन प्लंबिंग लायसेन्सच्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ?

उत्तर : विभागीय कार्यालय (छापील अर्जाप्रमाणे)

9) बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाच्या NOC च्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.?

उत्तर :

बांधकाम परवानगीसाठी ड्रेनेज विभागाच्या एन.ओ.सी.ची आवश्यकता नाही.

1.  विहीत नमुन्यातील अर्ज

2.  बांधकाम पुर्णत्वाचे इंजि./ वास्तुविशारद यांचे प्रमाणपत्र

3.  चटई क्षेत्र तक्ता (दोन प्रतित)

4.  बांधकाम पुर्ण झाल्याचा नकाशा वास्तुविशारद / इंजि. यांनी स्वाक्षरी केलेल्या (दोन प्रतित)

5.  कोरे कागद (पावत्या चिटकविण्यासाठी)

6.  मालकी हक्कासंबंधीचे कागदपत्र – 7/12 चा उतारा/ सीटी सर्व्हेचा उतारा/ प्रमाणीत केलेली खरेदीखताची नक्कल प्रत

7.  मंजुर नकाशाची मुळ प्रत

8.  बांधकाम परवाना आदेशाची प्रमाणित प्रत व त्यातील शर्तींची पुर्तता

9.  बिनशेती कर भरलेची प्रमाणित प्रत

10. भागश: पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी हमीपत्र

11. ज्योत्याचे पुर्णत्वाचा दाखला

मोकळा भुखंड निधी (व्हॅकन्ट प्लॉट टॅक्स)

10) ड्रेनेज कनेक्शनसाठी अर्ज कसा करावा ?

उत्तर :

बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्राप्त झाले नंतर विभागीय कार्यालयातील एक खिडकी योजना येथुन छापील अर्ज घेवुन अथवा मनापा संकेतस्थळावरुन अर्जाची प्रत प्राप्त करुन घेवुन, मनापाचे लायसन्स प्लंबर मार्फ़त अर्ज सबंधीत विभागीय कार्यालयाच्या एक खिडकी योजना येथे सादर करावा.

अर्जसोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत.

१) प्लंबर लायसन्सची प्रत.

२) बांधकाम पुर्णत्वाचा दाखला किंवा चालु वर्षाचा मालमत्ताकर भरल्याची पावती

३) रस्ता तोडावा लागत असल्यास त्याकरिता बांधकाम विभागाकडे आवश्यक ते शुल्क भरुन त्यांची एन.ओ.सी. जोडवी.

४) लोकेशन प्लॅन इ. सादर करणे आवश्यक

संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज उपलब्ध होईल.

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

11) अर्ज केल्यानंतर ड्रेनेज कनेक्शन परवानगी किती दिवसात मिळेल ?

उत्तर : अर्जसोबत सर्व कागदपत्रांची पुर्तता असल्यास अर्ज केल्यानंतर ड्रेनेज कनेक्शन परवानगी सात दिवसात मिळेल.

12) ड्रेनेज कनेक्शनचे चार्जेस किती आहेत ?

उत्तर :

रु.१०००/-  सह.गृहनिर्माण सोसा./ अपार्ट्मेंट/ गृहनिर्माण प्रकल्प प्रति सदनिका परंतु कमीत कमी रु.५०००/-

रु.१५००/-  प्रतिदुकान/ कर्यालय

रु.७०००/-  प्रति खानावळ, उपहारगृह, सर्व्हिस स्टेशन, हॉटेल/ लॉज/ हॉस्पिटल, मंगलकार्यालय व समारंभ हॉल, रेस्टारंट इत्यादी

रु.२५००/-  प्रतिकनेक्शन, बंगला, स्वतंत्र घर, ट्वीन बंगलो अथवा रो-हाऊस, सरकारी/निमसरकारी कार्यालय व शैक्षणिक संस्था यासाठी स्वतंत्र कनेक्शन केल्यास.

तसेच रस्ता तोडावा लागत असल्यास बांधकाम विभागाकडे त्याचे शुल्क भरुन त्याची एन.ओ.सी. प्राप्त करणे आवश्यक आहे.

13) ड्रेनेज कनेक्शनचे चार्जेस कुठे भरावयाचे ?

उत्तर : नविन बांधकाम असल्यास बांधकाम परवानगी घेतांना नगररचना विभागाकडे तसेच जुने कनेक्शनसाठी सबंधीत विभागीय कार्यालय. येथे ड्रेनेज कनेक्शनचे चार्जेस भरता येतात.

14) ड्रेनेज कनेक्शन करण्यासाठी लायसन्स प्लंबरची माहिती कोठे मिळतील ?

उत्तर : विभागीय कार्यालयात पाणी पुरवठा विभागाकडे तसेच मनापाच्या वेब साईटवर लिस्ट उपलब्ध आहे.

15) प्लंबिंग लायसन्सचे नुतनीकरण किती वर्षांनी करावे लागते ?

उत्तर : दर वर्षी

16) प्लंबिंग लायसन्सचे नुतनीकरणासाठी अर्ज कोठे करायचा?

उत्तर :

संबंधित विभागात एक खिडकी मध्ये अर्ज उपलब्ध होईल.

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490,2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर - 2354786

17) प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठीच्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ?

उत्तर : विभागीय कार्यालय येथील फॉर्म प्रमाणे

18) प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी फी कोठे भरावयाची ?

उत्तर : विभागीय कार्यालय

19) प्लंबिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी किती फी भरावी लागते. ?

उत्तर : र.रू.50/-

20) प्लंबिंग लायसन्सच्या नुतनीकरणसाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसात नुतनीकरण करून मिळेल ?

उत्तर : 5 दिवस

21) ड्रेनेज कनेक्शन केल्यावर पुर्णत्वाचा दाखला घेणे आवश्यक आहे का ?

उत्तर : बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर ड्रेनेज कनेक्शन देण्यात येईल.