Frequently Asked Questions - Fire Department
Quick Search

1) आग लागल्याची किंवा अन्य आपत्कालीन दुर्घटनेची माहिती / खबर अग्निशामक दलास कशी दयावी?

उत्तर :

आग किंवा अन्य आपत्कालिन दुर्घटना घडल्यास त्याची माहिती नजीकच्या अग्निशमन दलावर प्रत्यक्ष जावून किंवा खालील फोन क्रमांकावर देता येईल.

केंद्राचे नांव फोन नं.

1)  मुख्य अग्निशमन केंद्र 101/2590871

2)  पंचवटी अग्निशमन केंद्र 2512919

3)  नाशिकरोड अग्निशमन केंद्र 2461379

4)  सिडको अग्निशमन केंद्र 2393961

5)  सातपुर अग्निशमन केंद्र 2350500

सदर माहिती देतांना माहिती देणा-याने आपले स्वत:चे नांव व फोन नंबर व पत्ता यांसह घटनास्थळाचा पत्ता व घटनेची माहिती थोडक्यात, परंतु शांतपणे देणे आवश्यक आहे.

2) अग्निशामक दलाची सेवा कोणत्या कारणांकरिता घेता येते?

उत्तर : कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत / आपत्ती मध्ये मालमत्ता हानी व जिवित हानी वाचविण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेता येते.

3) अग्निशामक विभाग कोणकोणत्या प्रकारची सेवा पुरवते?

उत्तर :

अग्निशामक दलाकडून

1.  आग विझविणे

2.  रोड अपघातामध्ये जीव बचावाच्या दृष्टीने शोधबचाव व मदतकार्य करणे

3.  रासायनिक दुर्घटनांमध्ये बचाव व मदतकार्य करणे

4.  घर पडल्यास शोधबचाव व मदतकार्य करणे.

5.  नदीपात्रातील वाहणा-या वा बुडालेल्या व्यक्तींचा शोध व मदतकार्य करणे.

या प्रकारचे कोणत्याही प्रकारच्या आपत्ती मधील शोधबचाव व मदतकार्य अग्निशमन दलाकडून केले जाते.

4) अग्निशामक विभागाकडून दिल्या जाणार्‍या सेवेसाठी किती शुल्क आकारले जाते?

उत्तर :

नाशिक महानगरपालिका हद्दीतील रहिवासी व वाणिज्य आस्थापनांना / इमारतींना आगी लागल्यास अग्निशामक दलाकडून निशुल्क सेवा पुरविली जाते.

तथापि, औद्योगिक क्षेत्रामध्ये आग लागल्यास त्या बाबत विझविणेसाठी प्रती 3 तासासाठी प्रति वाहन र.रू. 2000/-

मनपा हद्दीमध्ये बंब स्टँडबाय फी प्रती वाहन र.रू. 3000/- एवढे शुल्क आकारणेत येते.

तसेच आग विझविणेचा दाखला फि

अनिवासी करिता र.रू. 2000/- किमान,

औद्योगिक – लघु उद्योग – र.रू.2000/- किमान,

मोठे उद्योग – र.रू. 5000/- किमान

वाहनांसाठी किमान, र.रू. 500/- ते र.रू.5000/- असे शुल्क आकारले जाते.

5) आग लागलेली असताना मी अग्निशमन दलास कशा प्रकारे मदत करू शकतो?

उत्तर :

आपण उपरोक्त अ.क्र. 1 नुसार

1.  घटनास्थळाची व घटनेची माहिती शांतपणे अग्निशामक दलास द्यावी. सदर घटनास्थळी पोहचण्यासाठी मार्गदर्शन करणेकामी रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी उभे राहून रस्ता दाखवावा.

2.  अग्निशमन दलासंदर्भातील कार्य आपण प्रशिक्षित असल्यास स्वत: सुरू करू शकतात.

3.  सामान्य नागरिक या नात्याने घटनास्थळापासून दूर राहून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक घटनास्थळ व आजूबाजूचा परिसर मोकळा होईल या दृष्टीने खबरदारी घ्यावी.

सोबतच्या नागरिकांना शांत करून घटनास्थळापासून दुर नेण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून अग्निशमन दलातील कर्मचा-यांना किमान वेळेत योग्य काम करता येईल. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येवून नुकसान कमी करता येईल.

6) अग्निशामक विभागाकडून कोणत्या प्रकारची ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात येतात?

उत्तर :

अग्निशमन विभागाकडून 15 मी. पेक्षा उंच रहिवासी इमारती, तसेच उंची विचारात न घेता 150 चौ.मी. पेक्षा जास्त उंची असलेल्या अरहिवासी व विशेष इमारती साठी बांधकाम पुर्व अग्निशामक दाखला व अंतिम अग्निशामक दाखला असे 2 दाखले देण्यात येतात.

या शिवाय विस्फोटक कायदा, गॅस सिलेंडर कायदा, पेट्रोलियम कायदा इ. खाली आवश्यक असणारे अग्निप्रतिबंधक दाखले तसेच हॉस्पिटल, हॉटेल्स / रेस्टॉरंट (लॉजिंग) इ. ना आवश्यक असलेले अग्निप्रतिबंधक दाखले / नुतनीकरण दाखले देण्यात येतात.

7) अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर : विभागीय कार्यालयातील एक खिडकी योजना तसेच नगररचना विभागातील एक खिडकी योजनेकडे अर्ज करावा.

8) अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती कालावधी लागतो?

उत्तर : सर्व बाबींची पुर्तता असल्यास कमाल 8 दिवस.

9) अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्राकरिता किती शुल्क आकारले जाते?

उत्तर : मा.महासभा ठराव क्रमांक 732 दि.21/06/2010 नुसार फि आकारणी करण्यात येत असून सदरच्या ठरावाची प्रत महानरगपालिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

10) अग्निशामक विभागाव्दारे कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते?

उत्तर :

अग्निशामक विभागाकडून प्राथमिक आगविमोचन संदर्भात प्रशिक्षण देता येते.

नाशिक मनपा अग्निशामक दलाकडून महाराष्ट्र शासनाच्या प्रशिक्षण उपक्रमाखाली शासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण देण्यात येते.

11) अग्निशामक विभागाव्दारे प्रशिक्षणाकरिता किती फी आकारली जाते?

उत्तर : मा. शासनाकडून फी आकारणी केली जाते.

12) अग्निशामक विभागाव्दारे दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणाचे स्वरूप कसे आहे?

उत्तर : प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण असून, त्यामध्ये आगीचे प्रकार, आग विझविण्यासाठी वापरावयाच्या पध्दती, उपकरणे, यंत्रसामुग्री हाताळावयाचे प्रशिक्षण, प्रथमोपचार, ड्रील व कवायत इ. बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

13) नाशिक मनपा हद्दीत उंच इमारती बांधण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे ?

उत्तर :

1.  भारताची राष्ट्रीय बांधकाम संहिता 2005 भाग 4 मधील तरतूदीनुसार 15 मी. पेक्षा उंच इमारती या 12 मी. रोड लगत असणे आवश्यक असून, सदर रस्ता किमान एका बाजूने दुसऱ्या 12 मी. रूंदीच्या मिळाला पाहिजे.

2.  15 मी. पेक्षा उंच उंचीच्या रहिवासी व 9 मी. पेक्षा उंच अनिवासी (सर्व प्रकारच्या इमारती) साठी किमान 2 जिने आवश्यक असून, सदरचे जिने एकमेकांपासून लांब विरूध्द टोकाला परंतु, एकमेकांना जोडलेले असावे.

3.  15 मी. पेक्षा उंच इमारतीमध्ये 8 व्यक्ती (544 कि.ग्रॅ.) क्षमता असलेली फायरलिफ़्ट असणे, बंधनकारक आहे. सदर लिफ्ट तळमजल्यावर आणण्यास तळमजल्यावर फायरमन स्विच असणे आवश्यक असून, सदर लिफ्टचा छतामध्ये सिलिंग हॅच असणे आवश्यक आहे.

4.  आपत्कालिन परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होत असलेने इर्मजन्सी लाइटिंग, फायर पंप, फायर लिफ्ट इ. वापरणेसाठी स्वंतत्र डिझेलवरील जनरेटर ची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

या शिवाय अग्निप्रतिबंधक दाखल्यात दिल्याप्रमाणे आग विझविणे साठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या, आगप्रतिबंधक उपाययोजना बसविणे आवश्यक आहे.15 मी. पेक्षा उंच इमारतीला वीज अवरोधक यंत्रणा (लाईटनिंग ॲरेस्टर) बसविण्यात यावा.

14) नविन इमारतीमध्ये सदनिका खरेदी करतांना कुठल्या बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे?

उत्तर : सदनिका खरेदी करतांना नागरिकांच्या बांधकाम व्यवसायिकांकडे आगप्रतिबंधक दाखल्याची मागणी करावी. व उपरोक्त मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद केलेल्या बाबींची पुर्तता आहे, याची खात्री करून सदनिका खरेदी करावी.

15) इमारतीत राहावयास आल्यानंतर मालक / भोगवटदार यांनी काय काळजी घ्यावी ?

उत्तर : आगप्रतिबंधक कायद्यानुसार ज्या इमारतींना आगप्रतिबंधक उपाययोजना बसविणे आवश्यक आहे. अशा इमारतीमध्ये राहणार मालक / भोगवटदार यांना दरवर्षी जानेवारी / जुलै महिन्यात इमारतीचे फायर ऑडिट करून त्या बाबतचा दाखला फॉर्म बी मध्ये अग्निशामक दलाच्या कार्यालयात दाखल करणे बंधनकारक आहे.

16) इमारतीमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना केलेली नसल्यास किंवा केलेली उपाययोजना चालु स्थितीत नसल्यास त्या बाबत अग्निप्रतिबंधक कायद्यामध्ये काय तरतुद आहे ?

उत्तर : इमारतीमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना केलेली नसल्यास किंवा केलेली उपाययोजना योग्य व सुस्थितीत नसल्यास किंवा त्यामध्ये फेरबदल केलेले असल्यास अग्निशामक दलाकडून काही कालावधी देवून सदरची यंत्रणा बसविणे किंवा दुरूस्त करून घेणेसाठी लेखी सुचित केले जाईल. अग्निशामक दलाकडून सुचना मिळालेनंतर देखील वरील बाबतीत पुर्तता नसल्याचे आढळून आल्यास कायद्यातील कलम 8 नुसार इमारतीचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडीत करण्याचे किंवा इमारत सीलबंद करण्याचे अधिकार अग्निशमन अधिकाऱ्यांना आहेत. या प्रकारची कार्यवाही केलेनंतर सुध्दा मालक / भोगवटदारांनी तरतुदीचे उल्लंघन केले, तर मालक व भोगवटदार यांना कायद्यातील कलम 36 नुसार दोष सिध्द झाल्यास 6 महिन्यांपेक्षा कमी नसेल, इतकी सक्षम कारावासाची शिक्षा व र.रू. 20000/- पेक्षा कमी नसेल, इतक्या आर्थिक दंडाची शिक्षा होवु शकते.