Frequently Asked Questions - Estate Department
Quick Search

1) महानगरपालिकेच्या व्यायाम शाळा किती आहेत?

उत्तर : एकुण व्यायामशाळा 102 आहे.

2) महानगरपालिकेची व्यायामशाळा सेवाशुल्कावर चालवण्यास घेण्यासाठी काय करावे लागते?

उत्तर : मा.महासभा / मा. स्थायी समितीची मान्यता व चेकलिस्ट मध्ये नमुद कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह संबंधित संस्थेचा मागणी अर्ज. (जसे कार्य. मंडळाचा प्रयोजनासह ठराव, लेआउट मधील प्लॉट धारकांची संमती (7/12 उताऱ्यासह) व त्याबाबत रूपये 100/- स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्रक. संस्था नोंदणी प्रत, घटना, आर्थिक तरतूद, मा. धर्मदाय आयुक्त यांचेकडील जमाखर्च तपासणीचा 3 वर्षाचा अहवाल, संबंधीत वॉर्डाचे दोन्ही नगरसेवकांचा नाहरकत दाखला, अभिन्यास व बांधकाम नकाशा प्रत.) याबाबतची नियमावली व धोरण ठरविण्यात येत आहे. तयानुसार निश्चित होणार्‍या अटी-शर्ती लागु राहतील.

3) व्यायामशाळा सेवा शुल्कावर घेणेसाठी कोणाशी संपर्क करावा?

उत्तर : मिळकत विभाग, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक महानगरपालिका, नाशिक

4) महानगरपालिकेची व्यायामशाळा किती महिने कराराने दिली जाते?

उत्तर : कमीत कमी 12 महिने (1 वर्ष) व जास्तीत जास्त 60 महिने (5 वर्ष) कराराने दिली जाते.

5) महानगरपालिकेच्या व्यायामशाळे संबंधी तक्रार कोणाकडे करावी?

उत्तर : वापरासंबंधीची तक्रार संबंधित विभागाचे विभागीय अधिकारी अथवा मिळकत व्यवस्थापक दुरूस्ती संबंधीची तक्रार संबंधित विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करावी.

6) महानगरपालिकेची किती मैदाने आहेत ? कोठे आहेत ?

उत्तर : खुल्या जागा – १६१३ (Open Space)
आरक्षणाअंतर्गतची मैदाने ४ (१. गोल्फ़ क्लब, २. क्लब हाऊस, ३. महात्मानगर, ४. शिखरेवाडी-ना.रोड), स्टेडीयम - 2 (१. संभाजी स्टेडीयम, नविन नाशिक, २. मिनाताई ठाकरे स्टेडीयम, पंचवटी)

7) महानगरपालिका क्षेत्रात एकुण समाजमंदीर, अभ्यासिका, वाचनालय किती आहेत ?

उत्तर :

एकुण समाजमंदीर – 274

अभ्यासिका / वाचनालये – 70 आहेत.

8) महानगरपालिकेचे समाजमंदीर कोणत्या कारणासाठी उपलब्ध करून देता येते ?

उत्तर : लोकोपयोगी सार्वजनिक उपक्रम व कार्यक्रमाकरीता उपलब्ध करुन देण्यात येते.

9) महानगरपालिकेचे समाजमंदीर भाडे तत्वावर घेणेसाठी किती शुल्क आकारण्यात येते ?

उत्तर : प्रिमियम रक्कमेच्या 2.5 टक्के प्रतिवर्ष, याबाबतचा धोरणात्मक निर्णय व नियमावली अंतिम व्हावयाची आहे. सदर निर्णय बंधनकारक राहील.

10) महानगरपालिकेचे समाजमंदीर भाडे तत्वावर घेणेकामी अर्ज कोठे सादर करावा ?

उत्तर : मिळकत विभाग, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक महानगरपालिका, नाशिक

11) महानगरपालिकेचे समाजमंदीर भाडे तत्वावर घेणेकामी मागणी अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावी ?

उत्तर : चेकलिस्ट मध्ये नमुद केलेल्या कागदपत्राच्या साक्षांकित छायांकित प्रती संबंधित संस्थेने मागणी अर्जासोबत सादर करावयाची आहेत. (जसे कार्य. मंडळाचा प्रयोजनासह ठराव, संस्था लेआउट मधील असावी व त्याबाबत रूपये 100/- चे स्टॅम्प पेपरवर नमुद करावे संस्था नोंदणी प्रत, घटना, आर्थिक तरतुद, प्लॉट धारकांचे संमती पत्र. (7/12 उताऱ्यासह) धर्मदाय आयुक्त यांचेकडील जमाखर्च तपासणीचा 3 वर्षाचा अहवाल संबंधीत वॉर्डाचे दोन्ही नगरसेवकांचा नाहरकत दाखला, अभिन्यास व बांधकाम नकाशा प्रत.)

12) महानगरपालिकेची आरक्षित जमिनीचा मोबदला मिळणेकामी काय करावे लागते ?

उत्तर : नगररचना अथवा मिळकत विभागाशी संपर्क साधून टी.डी.आर. / एफ़.एस.आय अथवा खाजगी वाटाघाटीव्दारे मोबदला मिळणेकरीता विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा लागतो.

13) भूसंपादनाकरीता कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

उत्तर : संबंधित जागामालकाचे मालकी हक्क दर्शविणारी कागदपत्रे जसे 7/12 उतारा, ६-ड नोंदी, ना.ज.क.म. दाखले, ULC नकाशा, DILR नकाशा इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

14) आरक्षित जमिनीचा मोबदला कोणत्या स्वरूपात प्राप्त होतो ?

उत्तर : टी.डी.आर., एफ.एस.आय / ए.आर./  वाटाघाटीव्दारे अथवा भूसंपादन कायद्यानुसार विहित प्रक्रिया राबवुन मोबदला प्राप्त होतो.