Frequently Asked Questions - Marriage Registration
Quick Search

1) महानगरपालिकेत विवाह नोंदणी कोठे करता येते?

उत्तर : सर्व विभागीय कार्यालय अंतर्गत ( नाशिक पुर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, पंचवटी, सिडको, सातपुर )

2) विवाह नोंदणी फॉर्म कोठे मिळतात?

उत्तर : www.nashikcorporation.in महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

3) विवाह नोंदणी फॉर्म कोठे दाखल करावा?

उत्तर : वधु किंवा वर यापैकी एक स्थानिक असलेल्या निबंधकाच्या विभागीय कार्यालयात

4) वधु वर नोंदणीसाठी आवश्यक अट काय आहे?

उत्तर : वधु व वर दोघे सज्ञान व दोघांपैकी एकजण तरी त्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

5) विवाह नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

उत्तर : वधु व वर यांचे वयाचे, रहिवासी, पुरावे, तीन साक्षिदार यांचे रहिवासी पुरावे, लग्न पत्रिका, लग्नाचा फोटो, र.रू. 100/- कोर्ट फि स्टॅम्प, वधु व वर यांचे तीन पासपोर्ट साईज फोटो व साक्षिदार यांचे प्रत्येकी दोन फोटो.

6) लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास काय कागदपत्रे लागतात?

उत्तर : वधु व वर, तीन साक्षिदार यांचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.

7) वर-वधू घटस्फोटीत असल्यास कोणता पुरावा आवश्यक आहे?

उत्तर : वर-वधू पुर्वायुष्यात घटस्फोटीत असल्यास न्यायालयाचा हुकूमनामा सत्यप्रत व प्रतिज्ञापत्र नोटरी रजि. दस्त पुरावा बांधनकारक आहे.

8) वधू-वर पैकी विधवा / विधूर असल्यास कोणती कागदपत्रे द्यावीत?

उत्तर : संबंधिताचे मृत्यु प्रमाणपत्र

9) विवाह झालेबद्दल आणखी काय पुरावा लागतो?

उत्तर : वधु व वर यांचे वयाचे, रहिवासी, पुरावे, तीन साक्षिदार यांचे रहिवासी पुरावे, लग्न पत्रिका, लग्नाचा फोटो, र.रू. 100/- कोर्ट फि स्टॅम्प, वधु व वर यांचे तीन पासपोर्ट साईज फोटो व साक्षिदार यांचे प्रत्येकी दोन फोटो.

10) विवाह नोंदणीसाठी कोर्ट फी स्टँम्प लागतो का?

उत्तर : होय र.रू.100/- चा स्टॅम्प लागतो.

11) इतर धर्माचे बाबतीत योग्य ती कागदपत्रे नसल्यास कोणती कागदपत्रे दाखल करावी?

उत्तर : मुस्लीम धर्मीयांच्या विवाह नोंदणीसाठी त्याच्या शहर – ए – काझी यांच्या कडील निकाहनामा

12) विवाह नोंदणीची तारीख किती दिवसात मिळते?

उत्तर : संबंधित कार्यालयातील निबंधकांचे दैनदिन कामकाजानुसार लवकरात लवकर ती तारीख देण्यात येते.

13) विवाह नोंदणीसाठी वधू- वर प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे का?

उत्तर : होय.

14) विवाह नोंदणी करीता फॉर्मची किती रक्कम भरावी?

उत्तर : विवाह नोंदणी करीता नमुना ड कलम ५ अन्वये रु. ५०/- फ़ी भरावी लागेल.

15) विवाह नोंदणी करीता किती दिवसाचा कालावाधी लागतो?

उत्तर : विवाह झाल्यापासुन ९० दिवसापर्यंत विवाह नोंदणी करणे बंधन कारक आहे.

16) साधारण ९० दिवसापर्यंत रजि फ़ि किती?

उत्तर : ९० दिवसापर्यंत रु. ५०/- विवाह नोंदणी रजि फ़ि भरावी.

17) एक वर्षा पर्यंत विवाह नोंदणी रजिस्ट्रेशन फ़ी किती भरावी?

उत्तर : ९० दिवसानंतर १ वर्षापर्यंत विवाह नोंदणी रजिस्ट्रेशन फ़ी विलंब शुल्क एकुन १५०/- रु. भरावे लागतात.

18) एक वर्षा पुढील कालबध्द विलंब फ़ी किती भरावी?

उत्तर : एक वर्षानंतर अधिक कालावधीकरीता ५०+२००=२५० रुपये विवाह रजि. फ़ी भरावी लागते.

19) विवाह नोंदणी नमुना ३ मध्ये काय माहिती द्यावी लागते?

उत्तर : विवाह नोंदणी फॉर्मवर विवाह दिनांक, स्थळ, वर-वधु ३ साक्षिदार यांचे फोटो लावुन मराठी व इंग्रजीत माहिती, कोर्ट स्टॅम फ़ी लावुन माहिती देणे.

20) विवाह नोंदणी नमुना ड ज्ञापन सोबत कोणाचे दस्ताऎवज जोडावे लागतात?

उत्तर : वर-वधु यांचे लिव्हींग सर्टि., पॅनकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, घरपट्टी साक्षिदार यांचा रहिवासी पुरावा व वर-वधु यांचे फोटो, लग्नपत्रिका, फोटो.

21) गोषवारा नं १ व गोषवारा नं २ या मध्ये कोणती माहिती भरावी लागते?

उत्तर : गोषवारा नं १ मध्ये वर-वधुचा फोटो लावुन पुर्ण पत्ता, वय वर्ष व स्वाक्षरी गोषवारा २ मध्ये १ ते ३ साक्षिदारांची माहिती व फ़ोटो लगतात.

22) विवाह नोंदणी करीता पुर्ण ज्ञापन सोबत दिलेले दस्त पुरावा फ़ाईल तपासणी नंतर पुढील कामकाज कसे?

उत्तर : विवाह नोंदणी फ़ाईल, दस्ताऎवज सकळी १० ते १ दरम्यान सर्व दस्तपुरावे नियमानुसार सत्यप्रती फ़ोटो स्वाक्षरी निवास पुरावा खात्री केल्यावर रजि. दिनांक देता येतो.

23) विवाह नोंदणी रजिस्ट्रेशन नोंदणी रजिस्टारला कोणती माहिती द्यावी लागते?

उत्तर : विवाह नोंदणी रजिस्ट्रेशन रजिस्टारला वर-वधु यांचा विवाह दिनांक, स्थळ व धर्म, पुर्ण पत्ता, विवाहाचे वेळेचे वय, खंड क्रं. वर-वधु यांची स्वाक्षरी घेतली जाते.

24) विवाह नोंदणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विवाह नोंदणी प्रामाणपत्र केव्हा मिळ्ते?

उत्तर : विवाह नोंदणी रजि. निंबधक सो. यांचे समोर झाल्यावर त्यांची खात्री झाल्यावर, स्वाक्षरी झाल्यावर तीन दिवसात प्रामाणपत्र वितरण होते.