Frequently Asked Questions - Medical Department
Quick Search

1) नाशिक मनपा हददीमध्ये मनपाची एकुण किती रुग्णालये / दवाखाने आहेत?

उत्तर : नाशिक मनपा ह्द्दीमध्ये मनपाची एकुण ६ रुग्णालये, ५ प्रसुतीग्रुह, ८ दवाखाने, ४ फिरते दवाखाने व ३० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.

2) मनपा परीसरात असणा-या रुग्णालये / दवाखाने यांचे पत्ते व संपर्क क्रमांक काय आहेत?

उत्तर :

नाव पत्ता दुरध्वनी क्र.

जे.डी.सी. बिटको रूग्णालय नाशिक रोड  शाहुपथ, नाशिक रोड 2465722

इंदिरागांधी रूग्णालय पंचवटी, पंचवटी कारंजा, नाशिक 2621331

डॉ. झाकिर हुसेन रूग्णालय, कथडा व्दारका, नाशिक. 2590049

गंगापुर रूग्णालय. गंगापुर, नाशिक 2590049

सा. ज्यो. फुले. रूग्णालय नाशिकरोड, सिन्नर फाटा, नाशिक 2230029

श्री स्वामी समर्थ रुग्णालय मोरवाडी, सिडको, नाशिक. 2393425

जिजामाता प्रसूतिगृह मेनरोड, नाशिक 2597981

मुलतानपुरा प्रसूतिगृह जुने नाशिक –

मायको सातपुर प्रसूतिगृह सातपुर, नाशिक 2350598

दसक पंचक प्रसूतिगृह पंचक, नाशिकरोड 2436058

उपनगर प्रसूतिगृह उपनगर, नाशिक. 2416320

ललिताशास्त्री दवाखाना मेनरोड, नाशिक. 2597981.

मल्हारगेट दवाखाना रविवार कारंजा, नाशिक. –

वाल्मीकनगर दवाखाना पंचवटी, नाशिक. –

सं.गा.म.ॲलो दवाखाना जुने नाशिक. –

मायको पंचवटी दवाखाना पंचवटी, नाशिक 2513137

सिडको दवाखाना सिडको नाशिक. 2373422

पिंपळगांव खांब दवाखाना पिंपळगांव खांब, नाशिक –

महाराष्ट्र हौसिंग कॉलनी दवाखाना सातपुर, नाशिक 2365990

श.आ.सेवा केंद्र शासकिय रूग्णालय त्र्यंबक रोड, नाशिक 2576106

श.आ. सेवा केंद्र, नाशिक मेनरोड, नाशिक 2597981

श.आ. सेवा केंद्र नाशिकरोड नाशिकरोड, नाशिक 2462051

श.आ. सेवा केंद्र सातपुर. सातपुर, नाशिक 2350598.

आर.सी.एच. केंद्र गंगापुर. गंगापुर, नाशिक 2230029

श.आ.सेवा केंद्र पंचवटी. पंचवटी, नाशिक 2513137

आर.सी.एच. केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय. इंदिरा गांधी, नाशिक. 22621331.

श.आ.सेवा केंद्र सिडको. सिडको, नाशिक 2373422

आर.सी.एच. केंद्र मोरवाडी. मोरवाडी, नाशिक 2393425

आर.सी.एच. केंद्र पिंपळगांव खांब. पिंपळगांव खांब, नाशिक –

श.आ.सेवा केंद्र व्दारका, नाशिक 2590049

आर.सी.एच.केंद्र बजरंगवाडी व्दारका, नाशिक 2590049

आर.सी.एच.केंद्र उपनगर नाशिक 2416320

श.आ.सेवा केंद्र रेडक्रॉस, रविवार कारंजा नाशिक 2504926

श.आ.सेवा केंद्र सिन्नरफाटा, नाशिक 2464054

आर.सी.एच.केंद्र दसक पंचक नाशिक 2436058

श.आ.सेवा केंद्र त्रंबकरोड, नाशिक 2464054

शा.रूग्णालय नाशिक

3) नाशिक मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणा-या आंतररुग्ण तथा बाहय रुग्ण सेवा सुविधांची माहिती.

उत्तर :

रुग्णालयातील उपलब्ध सुविधा

अ.   जे.डी.सी.बिटको हॉस्पीटल

1.  अद्ययावत 4 ऑपरेशन थिएटर्स : सर्व प्रकारच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया

2.  स्वतंत्र आय.सी.यु. वॉर्ड : अतिगंभीर ह्रदयविकाराच्या रूग्णांसाठी

3.  स्वतंत्र जळीत कक्ष (बर्न वॉर्ड)

अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एन.आय.सी.यु.)

4.  जनरल वैद्यकिय विभाग – पुरूष व स्त्री

5.  जनरल बालरूग्ण विभाग

6.  अद्ययावत अपघात विभाग

7.  विषबाधा झालेल्या रूग्णांसाठी तत्पर उपचाराची व्यवस्था

8.  एक्स – रे व सोनोग्राफी विभाग

9.  ब्लड बँक व पॅथॉलॉजी विभाग

10. कॅज्युलिटी विभाग – 24 तास कार्यरत

11. स्वतंत्र अस्थिरोग विभाग

ब. डॉ.झाकिर हुसेन हॉस्पीटल, कथडा

1. अद्ययावत 2 ऑपरेशन थिएटर्स : सर्व छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया

2. जनरल पुरूष व स्त्री मेडीकल व सर्जिकल विभाग

3. बालरूग्ण जनरल व अतिदक्षता विभाग

4. जनरल ओ.पी.डी. – 24 तास सेवा

5. एक्स रे व पॅथॉलॉजी विभाग

6. प्रसुती विभाग

क. इंदिरा गांधी रूग्णालय, पंचवटी

1. जनरल ओ.पी.डी.

2. जनरल स्त्री मेडीकल व शस्त्रक्रिया विभाग

3. अद्ययावत 2 ऑपरेशन थिएटर्स

4. पॅथॉलॉजी लॅब

5. बालरूग्ण विभाग

6. प्रसती विभाग

प्रसुतिगृहातील उपलब्ध सुविधा

1.  ओ.पी.डी. विभाग

2.  प्रसुतीपुर्व तपासणी व नांव नोंदणी

3.  प्रसुती

4.  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

5.  लसीकरण

6.  पॅथॉलॉजी लॅब

4) नाशिक मनपा ब्लड बँकेमध्ये बुकिंग करणे शक्य आहे का?

उत्तर :

नाशिक मनपा ब्लड बँकमध्ये बिटको रूग्णालय येथे बुकिंग करणे शक्य आहे. फोन नं. 2465722,2462051

5) नाशिक शहरामध्ये नेत्रदान करावयाचे असल्यास कोठे संपर्क करावा?

उत्तर : नाशिक शहरामध्ये नेत्रदान करावयाचे असल्यास शासकिय रूग्णालय नाशिक येथे संपर्क साधावा फोन नं.2576106

6) मनपा परीसरात रुग्णवाहिका सेवा यासाठी संपर्क कसा करावा?

उत्तर : मनपा परिसरात रूग्णवाहिका सेवा यासाठी मुख्य वैद्यकिय अधिकारी संबधीत मनपा रूग्णालय येथे संपर्क करावा बिटको रूग्णालय फोन नं.2465722, कथडा रूग्णालय 2590049, इंदिरा गांधी रुग्णालय 2621331

7) जळीत रुग्णांकरिता कोणती सेवा उपलब्ध आहे?

उत्तर : जळीत रूग्णांकरीता बिटको रूग्णालयामध्ये स्वतंत्र जळीत कक्ष उपलब्ध आहे.

8) वैद्यकीय विभागामार्फत अंपगत्वाचा दाखला देण्यात येतो का?

उत्तर : वैद्यकिय विभागामार्फत अंपगत्वाचा दाखला देण्यात येत नाही.

9) नाशिक मनपा रुग्णालयामध्ये गरोदर माता व बालके यांना कोणत्या प्रकारच्या सेवा मोफत मिळतात?

उत्तर : नाशिक मनपा रूग्णालयामध्ये गरोदर माता व बालके यांना मोफत नोंदणी, लोहयुक्त व कॅल्शीयम युक्त औषधे, धनुर्वात, प्रतिबंध लस व जननी सुरक्षा योजनाअंतर्गत प्रसुती इ. सेवा मोफत देण्यात येतात.

10) नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेणा-या कोणत्या रुग्णांना शासकीय अनुदान मिळते?

उत्तर : नाशिक महानगरपालिकेच्या रूग्णालयातुन उपचार घेणाऱ्या गरोदर माता यांना जननी सुरक्षा अंतर्गत शासकिय अनुदानाचा लाभ दिला जातो.

11) नाशिक महानगरपालिका परिसरात पोस्ट मार्टेमची सोय कुठे आहे व त्या ‍ठिकाणी शीतगृह आहे का?

उत्तर : नाशिक महानगरपालिका परिसरात पोस्ट मार्टमची सोय जिल्हाशासकिय रूग्णालय नाशिक येथे उपलब्ध आहे.

12) नाशिक मनपात असलेले सर्व सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, मॅटर्निटी होम, डिस्पेन्सरी, क्लिनिक्स यांना मनपाचा परवाना घेणे बंधनकारक आहे का ?

उत्तर : नाशिक मनपात असलेले सर्व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मॅटर्निटी होम, डिस्पेन्सरी, क्लिनिक्स, यांना मनपाचा परवाना घेणे बंधनकारक आहे.

13) मनपाकडे मान्यताप्राप्त परवाना धारक हॉस्पीटल, दवाखाने, मॅटर्निटी होम किती आहेत ?

उत्तर : नाशिक मनपाकडे मान्यताप्राप्त परवाना धारक हॉस्पिटल, दवाखाने, मॅटर्निटी होम एकुण १७०० आहे.

14) विनापरवाना हॉस्पीटल, दवाखाने, मॅटर्निटी होम चालविता येतात का ?

उत्तर : विनापरवाना हॉस्पीटल, दवाखाने, मॅटर्निटी होम चालविता येत नाही.

15) हॉस्पीटल, दवाखाने, मॅटर्निर्टी होम परवाण्याकरीता अर्ज कुठे मिळेल ?

उत्तर : हॉस्पिटल, दवाखाने, मॅटर्निटी होम परवाण्याकरीता अर्ज वैद्यकिय विभाग राजीवगांधी भवन येथे मिळेल.

16) नर्सिंगहोम अर्जाची किंमत काय ?

उत्तर : नर्सिंगहोम अर्जाची किंमत १० रुपये आहे.

17) नर्सिंगहोम अर्ज कुठे जमा करावा ?

उत्तर : नर्सिंगहोम अर्ज वैद्यकिय विभाग, राजीव गांधी भवन येथे जमा करावा.

18) नर्सिंगहोम अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसांत परवाना मिळतो ?

उत्तर : नर्सिंगहोम अर्ज सादर केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली असल्यास १५ दिवसांत परवाना मिळतो.

19) नर्सिंगहोम परवाण्यासाठी अर्ज सादर करतांना कोणती कागदपत्रे जोडावी लागता ?

उत्तर :
१.  नोंदणी अर्ज (प्रती, वैदकिय अधिक्षक सो)
२.  फॉर्म बी
३.  वैद्यकिय फॉर्म
४.  डिग्री सर्टिफिकेट
५.  रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
६.  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नुतनीकरण सर्टिफिकेट
७.  जैविक कचरा ना हरकत दाखला (BMW)
८.  जैविक कचरा ना हरकत दाखला भरणा केल्याची पावती
९.  प्रदुषण नियंत्रण मंडळाचा दाखला (MPCB)
१०. घरपट्टी पावती/बिल
११. परिचारिका (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे प्रमाणपत्र) ५ खाटांसाठी १ परिचारिका
१२. अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (रूग्णालय/मॅटर्निटी होम)
१३. नविन नोंदणीसाठी नगररचना ना हरकत दाखला
१४. दोन फोटो
१.  नोंदणी अर्ज (प्रती, वैद्यकिय अधिक्षक सो)
२.  फॉर्म बी
३.  वैद्यकिय फॉर्म
४.  डिग्री सर्टिफिकेट
५.  रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
६.  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नुतनीकरण सर्टिफिकेट
७.  जैविक कचरा ना हरकत दाखला (BMW)
८.  जैविक कचरा ना हरकत दाखला भरणा केल्याची पावती
९.  प्रदुषण नियंत्रण मंडळाचा दाखला (MPCB)
१०. घरपट्टी पावती/बिल
११. परिचारिका (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे प्रमाणपत्र) ५ खाटांसाठी १ परिचारिका
१२. अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (रूग्णालय/मॅटर्निटी होम)
१३. नविन नोंदणीसाठी नगररचना ना हरकत दाखला
१४. दोन फोटो

 

20) नर्सिंगहोम अर्ज सादर करतांना अर्जासोबत किती शुल्क भरावे लागते ?

उत्तर : नर्सिंगहोम अर्ज सादर करतांना अर्जासोबत १० खाटांच्या पर्यंत १०० रुपये व १० खाटांच्या वर २०० रुपये प्रतिवर्षी शुल्क भरावे लागते.

 

21) नर्सिंगहोम परवाण्याचा कालावधी किती वर्ष आहे ?

उत्तर : नर्सिंगहोम परवाण्याचा कालावधी ३ वर्षांचा आहे.

22) नर्सिंगहोम परवाण्याचे नुतनीकरण किती वर्षासाठी करता येते ?

उत्तर : नर्सिंगहोम परवाण्याचे नुतनीकरण ३ वर्षांकरिता करता येते.

23) नाशिक मनपा कार्यक्षेत्रात असलेल्या सोनोग्राफी केंद्राना मनपाचा परवाना घेणे बंधनकारक आहे का ?

उत्तर : नाशिक मनपा कार्यक्षेत्रात असलेल्या सोनोग्राफी केंद्राना मनपाचा परवाना घेणे बंधनकारक आहे.

24) मनपाकडे मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्र किती आहेत ?

उत्तर : मनपाकडे मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्र ३९० आहेत.

25) विनापरवाना सोनोग्राफी केंद्र चालविता येतात का ?

उत्तर : विनापरवाना सोनोग्राफी केंद्र चालविता येत नाही.

26) सोनोग्राफी केंद्र परवान्याकरीता अर्ज कुठे मिळेल ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्र परवान्याकरीता अर्ज वैद्यकिय विभाग, राजीवगांधी भवन येथे मिळेल.

27) सोनोग्राफी केंद्राकरीता लागणा-या फॉर्म ए अर्जाची किंमत किती ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्राकरीता लागणा-या फॉर्म ए अर्जाची किंमत ५० रुपये आहे.

28) सोनोग्राफी केंद्राकरीता लागणा-या फॉर्म ए अर्ज कुठे जमा करावा ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्राकरीता लागणा-या फॉर्म ए अर्ज वैद्यकिय विभाग, राजीव गांधी भवन येथे जमा करावा.

29) सोनोग्राफी केंद्र परवाण्यासाठी अर्ज सादर करतांना कोणती कागदपत्रे जोडावी ?

उत्तर :

१. नोंदणी अर्ज (मा.वैद्यकीय अधिक्षक यांचे नावे)

२. फॉर्म ए – 2 प्रती

३. वैद्यकिय व्यावसायिक यांचे
    १. डिग्री सर्टिफिकिट
    २. रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट 
    3. Additional qualification (REG) certificate

४. सोनोग्राफी करणा-या डॉक्टरांचे 
   १. डिग्री सर्टिफिकिट
   २. रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट
   ३. Additional qualification (REG) certificate

५. ऍफिडेव्हिट
   १. सोनोग्राफी केंद्रधारकाचे 
   २. रेडिओलॉजिस्ट यांचे

६. मशीन पावती/कोटेशन

७. साईट प्लॅन (सोनोग्राफी मशीन ठेवण्याचे ठिकाण)

८. मनपाचे नर्सिंगहोम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

९. नुतनीकरणासाठी मागिल नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत

१०. प्रत्येकी सर्व कागदपत्रांचे दोन सेट झेरॉक्स प्रती आणाव्यात.

११. मागील पी.सी.पी.एन.डी.टी. ची प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत

 

30) सोनोग्राफी केंद्र परवाना अर्ज सादर करतांना अर्जासोबत किती शुल्क भरावे लागते ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्र परवाना अर्ज सादर करतांना अर्जासोबत हॉस्पिटल र.रु. ३५०००/-, फक्त सोनोग्राफी केंद्र र.रु. २५०००/- शुल्क भरावे लागते.

 

31) सोनोग्राफी केंद्र परवाण्याचा कालावधी किती वर्ष आहे ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्र परवाण्याचा कालावधी ५ वर्ष आहे.

32) सोनोग्राफी केंद्र परवाण्याचे नुतनीकरण किती वर्षासाठी करता येते ?

उत्तर : सोनोग्राफी केंद्र परवाण्याचे नुतनीकरण ५ वर्षासाठी करता येते.