Frequently Asked Questions - Secondary Education
Quick Search

1) नाशिक महापालिकेची स्वतःची किती माध्यमिक विद्यालये आहेत?

उत्तर : एकुण १३ माध्यमिक विद्यालये आहेत.

2) नाशिक महापालिका हद्दीतील मनपाच्या माध्यमिक शाळांचा ठिकाणी माहिती उपलब्ध आहे का?

उत्तर : होय.

3) महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या मनपाच्या माध्यमिक विद्यालयांपैकी किती विद्यालये अनुदानित व किती विनाअनुदानित आहेत?

उत्तर : मराठी माध्यमच्या २ अनुदानित व उर्दु माध्यमच्या २ अनुदानित तसेच मराठी माध्यमच्या विनाअनुदानित ९ मध्यमिक शाळा आहेत.

4) मनपाच्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची काय प्रक्रिया आहे?

उत्तर : माध्यमिक शाळेत प्रवेश अर्ज भरुन थेट प्रवेश मिळ्तो.

5) मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून किती फी आकारली जाते?

उत्तर : कोणत्याही प्रकारची फ़ी आकारली जात नाही.

6) मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मनपामार्फत कोणकोणत्या सोयीसुविधा पुरविल्या जातात?

उत्तर : मनपामार्फ़त विद्यार्थ्यांना गणवेश, मुलींसाठी सायकल, पाठयपुस्तके पुरविले जातात.

7) माध्यमिक शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनपर शिबीरांचे आयोजन केले जाते का?

उत्तर : विद्यार्थ्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागामार्फ़त व्यवसाय मार्गदर्शन दिले जाते.

8) मनपाचे क्रीडा प्रबोधिनी विद्यालय कोठे आहे?

उत्तर : नाही.

9) नाशिक महापालिकेमार्फत मनपा शाळा व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्या साठी काय सोय केली जाते?

उत्तर : मनपा माध्यमिक शाळेतील इ. ८ वी ते १० वीच्या ३ कि.मी. किंवा त्यापेक्षा अंतरावरुन शाळेत येणा-या मुलींना मनपा मार्फ़त सायकल खरेदीसाठी रक्कम दिली जाते.

10) मोफत बसपास योजनेचा लाभ मनपाचे शाळांव्यतिरिक्त इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही घेता येईल का ?

उत्तर : मोफत बसपास योजना लागु नाही.

11) इ. 10 वी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांसाठी कोणती शिष्यवृत्ती दिली जाते?

उत्तर : मनपातर्फ़े मनपा माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वीत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना गुण्वत्ता शिष्यवृत्ती दिली जाते.

12) शाळा सोडल्याचा दाखला कोठे मिळेल ?

उत्तर : संबंधित शाळेत.

13) शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी किती फी आकारणेत येते ?

उत्तर : फ़ी आकारली जात नाही.

14) शाळा सोडल्याचा दुबार दाखला मिळण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

उत्तर : संबंधिताचे प्रतिज्ञापत्र घेऊन दाखला देता येतो.

15) शाळा सोडल्याच्या दाखल्यातील कोणत्याही स्वरुपाचे (उदा. जन्मदिनांक, नाव, जात) नोंदीतील बदलाबाबत काय करावे लागेल?

उत्तर : विद्यार्थी शाळेत दाखल असतांना सादर केलेल्या पुराव्या आधारे मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे परवानगीने शालेय दप्तरी बदल केला जातो.

16) बोनाफाईड सर्टिफिकेट मिळण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

उत्तर : संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचेकडे अर्ज करावा लागतो.

17) मनपाच्या माध्यमिक विद्यालयातून शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा देण्याची सुविधा आहे का?

उत्तर :

होय.

18) विद्यालय व विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाते का?

उत्तर :

होय.

19) विद्यालय व विद्यालयाचे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मिळण्यासाठी अर्ज कोठे करावा?

उत्तर : संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / मनपा बांधकाम विभागाकडे

20) माध्यमिक शिक्षण विभागाबाबत माहिती तसेच काही तक्रार उद्भवल्यास कुठे दाखल करावी?

उत्तर : मा. उपआयुक्त (मु.नि.क.सं) मनपा नाशिक.