Frequently Asked Questions - Primary Education
Quick Search

1) महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर मनपाच्या प्राथमिक, खाजगी अनुदानित, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित माध्यमनिहाय किती शाळा आहेत?

उत्तर :

मनपा प्राथ. १२७+२=१२९ (मराठी-११०, हिंदी-४, उर्दु-१३ विना अनु. इंग्रजी-२)

खाजगी अनुदानित-८३ (मराठी ७६, हिंदी-१, उर्दु-५, गुजराथी-१)

खाजगी विनाअनुदानित-३९ (मराठी-२१, हिंदी-१, उर्दु-२, इंग्रजी-१५)

कायम विनाअनुदानित-८८ (मराठी-१०, इंग्रजी- ७८)

2) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009(R.T.E.) नुसार प्राथमिक शाळांमध्ये किमान कोणत्या भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. ?

उत्तर : मुख्या.कर्यालय, प्रत्येक शिक्षकांसाठी एक वर्गखोली, पिण्याचे पाणी, पुरेसे स्वच्छ्तागृह, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, रॅम्प, क्रिडांगण, शिक्षक, विदयार्थ्यासाठी शैक्षणिक व क्रिडा साहित्य.

3) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रत पाहण्यासाठी कोठे उपलब्ध होईल.?

उत्तर : www.maharashtra.gov.in मधील शालेय शिक्षण व क्रिडा विभागातील शासन निर्णय वेबसाईटवर.

4) मनपा व खाजगी प्राथमिक शाळेत इ. 1 लीसाठी नवीन प्रवेश घेण्याकरीता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते?

उत्तर :

जन्माचा दाखला, परंतु जन्म दाखला नसल्यासाठी इ. १ ली किंवा वयानुरुप प्रवेश दिला जातो आरटीई-२००९ कलम क्रमांक ४ अन्वये.

5) प्राथमिक शाळेतील प्रवेशाची कार्यपद्धती काय आहे ?

उत्तर :

पालकांची/मुलांची मुलाखत न घेता, देणग्या, फ़ी न घेता प्रवेश देणे.

प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश असल्यास लॉटरी पध्दतीने प्रवेश देणे.

6) आर. टी. ई नुसार 25टक्के आरक्षणामधून प्रवेश कोणत्या वर्गात दिला जातो? सदर वर्गाची एकूण प्रवेश क्षमता किती ?

उत्तर :

शाळेच्या opening class जो असेल त्यात प्रवेश दिला जातो.

इ. १ली च्या क्षमतेच्या २५% जागेवर प्रवेश दिला जातो.

7) 25 टक्के मोफत जागेवर प्रवेश कोणत्या प्रवर्गातील/संवर्गातील मुलांना दिला जातो?

उत्तर :

SC, ST संवर्गातील मुलांना (वंचित घटक)

BPL धारक इतर संवर्गातील मुलांना (आर्थिक दुर्बल घटक)

8) 25टक्के आरक्षणानुसार द्यावयाच्या प्रवेशाच्या अर्जाचा नमूना कोठे मिळेल?

उत्तर :

www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील शालेय शिक्षण व क्रिडा विभागातील कायदे व नियम या वेबसाईटवर.

मनपा शिक्षण मंडळ, नाशिक

२५% प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळेत.

9) 25टक्के आरक्षणानुसार प्रवेश अर्ज भरताना त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे?

उत्तर :

जातीचा दाखला (वंचित घटकांसाठी)

उत्पन्नाचा दाखला (आर्थिक दुर्बल घटकांसाठी, इतर संवर्गासाठी SC, ST वगळुन)

पालकाचा रहिवासी (पत्याचा) पुरावा.

10) शाळाबाह्य बालकांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करण्याकरीता आर.टी.ई. नुसार कोणती तरतूद करण्यात आली आहे? व त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

उत्तर :

कलम ४ नुसार वयानुरुप दाखल करणे व त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाची सोय करणे.

त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता नाही.

11) शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक वर्गात प्रवेश देताना कोणत्या वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो?

उत्तर : वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो.

12) अध्ययनात मागे राहीलेल्या विद्यार्थीना / समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या स्वरूपाचे विशेष मार्गदर्शन केले जाते?

उत्तर :

अतिरिक्त पुरक मार्गदर्शन, विशेष प्रशिक्षण.

वाचन-लेखन-गणन कार्यक्रम व गुण्वत्ता विकास कार्यक्रम.

13) प्राथमिक शाळेत इ. १ ली ला प्रवेश घेण्यासाठी मुलाचे वय किती असणे आवश्यक आहे?

उत्तर : वय वर्ष ६ पुर्ण असावे.

14) माध्यम बदलून दूस-या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास कोणत्या वर्गात (इयत्तेत) प्रवेश दिला जातो?

उत्तर : कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेता येतो. माध्यम बदलल्यास एक वर्ष मागील इयत्तेत प्रवेश दिला जातो. परंतु चाचणी घेवुन पुढील इयत्तेत शिक्षण घेण्यास पात्र ठरल्यास पुढील वर्गात प्रवेश दिला जातो.

15) पालकांनी विनंती केल्यास पाल्यास त्याच वर्गात पून्हा बसवता (ठेवता) येईल का?

उत्तर : नाही.

16) मनपा प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्याना कोणते साहित्य मोफत पुरविले जाते?

उत्तर :

सर्व शिक्षा अभियानामार्फ़त पाठयपुस्तके, स्वाध्यायपुस्तिका, गणवेश.

मनपा मार्फ़त SC, ST व BPL मुले वगळुन इतर मुलांना गणवेश , सर्व मुला-मुलींना शुज सॉक्स, कब बुलबुल/स्काऊट गाईड ड्रेस इ. (मा. मनपा महासभेने अंदाजपत्रक मंजुर केल्यास व निधी दिल्यास.)

17) मनपा, खाजगी अनु. शाळेतील विद्यार्थांना कोणत्या स्वरूपात शालेय पोषण आहार दिला जातो?

उत्तर : पोषण आहार शिजवुन दिला जातो. (आठवडयाच्या वेळापत्रकाप्रमाणे.)

18) शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी काय प्रकिया आहे?

उत्तर :

पालकांनी अर्ज केल्यास, नवीन शाळेने मागणी केल्यास हस्तांतरीत केला जातो. (कलम ५ नुसार)

19) मनपा प्राथमिक शाळामध्ये शाळा सोडल्याचा दाखला मिळणेकामी किती फी आकारली जाते?

उत्तर :

फ़ी आकारली जात नाही.

20) प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या प्रोत्साहनपर योजना आहेत?

उत्तर :

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती (ST विदयार्थ्यासाठी) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती.

(मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी.)

सावित्रीबाईफ़ुले शिष्यवृत्ती, (SC/NT च्या मुलींसाठी) अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती, (इ. १ ली ते ८ वी साठी) अस्वच्छ कामगार पाल्य शिष्यवृत्ती.  (इ. १ ली ते १० वी)

21) आधार कार्ड विद्यार्थांकरीता काढणे गरजेचे आहे काय? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर : आधार कार्ड काढणे गरजेचे आहे. त्यासाठी बोनाफ़ाईड सर्टिफ़िकेट, पालकाचा रहिवासी दखला ही कगदपत्रे लगतात.

22) बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते?

उत्तर : मुख्याध्यापाकांना विनंती अर्ज केल्यावर मिळ्ते.

23) विद्यार्थीना नांव, जात, जन्मतारीख इ. बाबीमध्ये बदल करावयाचे असल्यास काय करावे?

उत्तर :

सक्षम प्राधिका-यांच्या कार्यालयात विनंती अर्ज (सबळ पुराव्यासह) सादर करुन बदल करता येतो.

24) महापालिका कार्यक्षेत्रातील अपंग / विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी कोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात?

उत्तर :

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना आवश्यकतेप्रमाणे साहित्य पुरविले जाते व डे केअर सेंटर चालविले जाते.

फ़िरते विशेष शिक्षकांमार्फ़त अध्यापन कार्य केले जाते.

25) मनपा शाळेत शिक्षणासाठी, प्रवेशासाठी किती फी आकारली जाते?

उत्तर :

फ़ी आकारली जात नाही.

26) प्राथमिक शाळेविषयी माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकारात कोणाकडे अर्ज करावा लागतो? माहिती न दिल्यास कोणाकडे अपिल करावे?

उत्तर :

माहिती अधिकारी (मुख्याध्यापक) यांच्याकडे अर्ज करावा लागतो.

अपिलीय अधिकारी (प्रशासनधिकारी) मनपा क्षेत्रातील.


27) मनपा कार्यक्षेत्रात मनपाने चालवलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा किती व कोठे आहेत?

उत्तर : मनपाने चालविलेल्या इंग्रजी शाळा ३ आहेत. शा. क्र. २९ अंतंर्गत मखमलाबादनाका, शा. क्र. २२ अंतंर्गत विश्वासनगर, वि. नि. १५ अंतंर्गत चेहडी

28) पुर्व माध्यमिक व माध्यमिक इ 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थांना प्रोत्साहनपर कोणते बक्षीस दिले जाते?

उत्तर :

४ थी/ ७ वी प्रोत्साहनपर शासनामार्फ़त शिष्यवृत्ती दिली जाते.

मनपा मार्फ़त सत्कार कार्यक्रम राबविला जातो.

29) खाजगी प्राथमिक शाळांमध्ये फी आकारणी कशी केली जाते?

उत्तर :

शिक्षक, पालक संघामार्फ़त.

२१ मार्च २०१४ च्या रजपत्रात नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करुन निश्चित केली जाते.

30) खाजगी प्राथमिक शाळाबद्दल तक्रार असल्यास ती कोणाकडे करावी.?

उत्तर : प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण मंडळ, नाशिक व प्रशासनाधिकारी (प्राथ.) जि. प. नशिक यांच्याकडे