Frequently Asked Questions - Property Tax
Quick Search

1) मिळकतकराची आकारणी कोणत्या मिळकतींवर केली जाते ?

उत्तर : मनपा हद्दीतील सर्व निवासी, निवासेत्तर, वाणिज्य, औदयोगिक, शासकिय, निमशासकिय, मोकळ्या जमिनी इ. आकारणी केले जाते.

2) इमारतीची करआकारणी करताना कार्पेट/बिल्टअप क्षेत्रफळांपैकी कोणते क्षेत्रफळ विचारात घेतले जाते ?

उत्तर : कर आकारणी करते वेळी कार्पेट क्षेत्र विचारात घेतले जाते.

3) मिळकतीवर करआकारणी कशा प्रकारे केली जाते ?

उत्तर : त्या त्या विभागातील निश्चित केलेल्या प्रचलित दराने कार्पेट एरीया वरून एकुण भाडेमुल्ये काढले जाते. व त्यातुन 10 टक्के घसारा वजा जाता कर पात्र मुल्य काढण्यात येतो व त्यावर

सर्व साधारण कर 25 ते 31 टक्के

वार्षिक करपात्र भाडे मुल्य (रक्कम) कराचे दर
20,000 पर्यंत 25%
20,001 ते 40,000 27%
40,001 ते 60,000 29%
60,001 ते 1,00,000 30%
1,00,001 ते पुढे 31%

आग निवारण कर - 2%
वृक्ष संवर्धन कर - 1%
जल लाभ कर - 2%
स.स्वच्छता कर - 3%
मलनिसारण कर - 5%
पथ कर - 3%
मनपा शिक्षण कर - 2%

महाराष्ट्र शासनाचे कर

वार्षिक करपात्र भाडे मुल्य (रक्कम) सरकारी शिक्षण कर रोजगार हमी कर (फक्त निवासेत्तर वापरा करीता)

निवासी निवासोत्तर
75 ते 149 2% 4% 1%
150 ते 299 3% 6% 1.5%
300 ते 2,999 4% 8% 2%
3,000 ते 5,999 5% 10% 2.5%
6,000 ते पुढे 6% 12% 3%

4) मिळकतीवर करआकारणीची कार्यवाही किती दिवसात पूर्ण केली जाते ?

उत्तर : अर्ज प्राप्त झालेनंतर 15 दिवसाच्या आत केली जाते व हरकत असल्यास 1 महिना किंवा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला (नगररचना) मिळाल्यानंतर.

5) मिळकतकराचे बिल कुठे मिळेल ?

उत्तर :

1)  मनपा कार्यालयात मिळकत बिलावर नोंद केलेल्या पत्त्यानुसार मनपा कर्मचारी बिले घरपोच देतात.

2)  त्या त्या विभागिय कार्यालयात व तसेच ऑनलाईन वेबसाईट propertytax.nmctax.in व्दारे बिल प्राप्त करून घेता येतात.

6) मिळकतकर भऱण्याची अंतिम मुदत काय असते ?

उत्तर :

1)  चालु आर्थिक वर्षात 1 एप्रिल ला पहिल्या सहामाहिचा व 1 आक्टोबर ला दुसऱ्या सहामाहिचा भरणा आगाउ देय आहे.

2)  बिल मिळाले पासून 3 महिन्याचे आत अथवा बिल मिळाले असो किंवा नाही मात्र प्रती वार्षिक वेळेत कर भरणे बंधनकारक आहे.

7) मिळकतकर वेळेत भरला नाही तर किती दंड अथवा विलंबशुल्क भरावे लागते ?

उत्तर : बिल भरण्याची मुदत संपल्यानंतर दरमहा 2% शास्ती म.न.पा. करावर व शासकिय करावर 1% भरावी लागेल.

8) मिळकतकराचे बिल अथवा मिळकतकराची आकारणी यांबाबत तक्रार असल्यास कुठे संपर्क साधावा?

उत्तर :

त्या त्या विभागीय कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रावर, मुख्यालय कर विभाग, ऑनलाईन तक्रार इ. ठिकाणी तक्रार करता येईल.

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490, 2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6)  विभागीय कार्यालय नाशिक सातपुर – 2354786

9) मिळकतकराचा भरणा कोणत्या स्वरुपात व कुठे स्वीकारला जातो ?

उत्तर :

1)  मिळकतकरांचा भरणा रोख, चेक, डि. डी. इ. स्वरूपात स्विकारला जातो.

2)  सर्व विभागीय, उप कार्यालय व तसेच आयसीआयसीआय बँकेच्या सर्व शाखेत व ऑन लाईन पध्दतीने स्विकारला जातो.

10) धनादेश, पे ऑर्डर कोणाच्या नावे काढावी ?

उत्तर : Nashik Municipal Corporation नाशिक या नावे स्विकारला जातो.

11) मिळकतकर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे का ?

उत्तर :

होय

www.nashikcorporation.in या संकेत स्थळावर online utility या बटणावर click करून घरपट्टी अथवा पाणीपट्टी निवड करून Debit, Credit card or net banking व्दारे भरणा करता येते.

12) मिळकतकरामध्ये सवलत मिळावी यासाठीच्या काही योजना आहेत काय? असल्यास कोणत्या ?

उत्तर :

1)  बिल मिळालेपासून 15 दिवसाचे आत भरल्यास 1% रिबेट (सुट) दिले जाते.

2 ) सोलर उपकरण बसविले असल्यास

13) सोलर रिबेट (सुट) मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती ?

उत्तर :

अर्जदाराने अर्जासोबत (सोलर उपकरण बसविले असल्यास)

1)  सोलर उपकरण खरेदी केल्याचे इनव्हाईस बिल (मिळकतधारकांचे नावाने)

2)  आर्थिक वर्षातील मिळकत कराचा भरणा केलेली पावती.

इ. प्रकारचे कागदपत्र सादर करावे त्यानंतर भाग निरिक्षक मार्फत सोलरची खात्री करून मिळकत करात 5% सुट देण्याची कार्यवाही केली जाते.

14) करमाफी कोणत्या मिळकतीस लागू आहे ?

उत्तर :

1)  केंद्र शासनाच्या इमारतीस सर्वसाधारण करात सुट देण्यात येते.

2 ) नोंदणीकृत धार्मिक संस्थांना (मंदिराचा गाभारा) मज्जीद, चर्च, गुरूव्दारा, अमरधाम शेड, कोर्ट चेम्बर, इ. सर्वसाधारण करात सुट देण्यात येते.

15) ग्रीन बिल्डींग रेटींगसाठी मिळकतकरात काही सवलत आहे का?

उत्तर : निरंक

16) मिळकतीच्या करआकारणी प्रकरणी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर :

1)  जागेच्या मालकी हक्काबाबत (खरेदी खत, अपार्टंमेंट डीड, 7/12 उतारा, सिटी सर्व्हे उतारा, इ. नोंदणीकृत दस्ताऐवज)

2)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखला

3)  जागेचा वापर सुरू झाल्यास स्थळ पाहणी अहवाल

4 ) भाडेकरू वापराबाबत मालकाने स्वत: अर्ज केल्यास / करारनामा व इ. अनुशांगीक कागदपत्र

17) एम.आय.डी.सी/प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतींच्या करआकारणी प्रकरणी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर :

1)  जागेच्या मालकीबाबत नोंदणीकृत दस्तावेज

2 ) संबंधित प्राधिकरणाचा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला

18) मिळकतीचे वारसा हक्काने हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  मिळकतधारकाचा मृत्यू दाखला – मुळपत्र

2)  वारसा प्रमाणपत्र (कोर्ट प्रतिज्ञापत्र)

3)  चालु आर्थिक वर्षाचे कर भरल्याची पावती

4)  मनपाची नाव बदल फी

5 ) रजिस्टर बील (मृत्यूपत्र)

19) वाढीव बांधकामाची करआकारणी करताना आकारणी झालेल्या पूर्वीच्या जुन्या दरानेच केली जाते का?

उत्तर : नाही, त्या त्या विभागातील बांधकाम प्रकारानुसार, वापरानुसार निश्चित केलेल्या प्रचलीत दराप्रमाणे आकारणी केली जाते.

20) निवासी मिळकतीच्या वापरात बदल करुन बिगरनिवासी वापर सुरु केल्यास करआकारणी कशी केली जाते ?

उत्तर :

मिळकतीच्या वापरातील बदलास आकारणी करतांना

1)  मिळकतधारकाने भाडेकरू ठेवल्याचे स्वत: निर्दशनास आणून दिल्यास निवासी दराच्या दुप्पट व निवासेत्तर असल्यास दंड दुप्पड + 1 पट दराने आकरणी प्रचलीत दराने केली जाते.

2)  भाडेकरू वापर चालु असल्यास व निदर्शनास आल्यास निवासी दराच्या तीन पट व निवासेत्तर असल्यास (3+1) पट दराने आकारणी केली जाते.

3 ) जागेचा वाणिज्यिक वापर मिळकतधारकाने स्वत: निदर्शनास आणून दिल्यास अधिकृत असल्यास प्रचलीत निवासेत्तर दराने एक पट व अनाधिकृत असल्यास तीन पट दराने आकारणी केली जाते.

21) मिळकतीच्या हस्तांतरणाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  मालकी हक्काची नोंदणीकृत कागदपत्रे

2)  सोसायटी असेल तर सोसायटीचा ठराव, (ना हरकत दाखला)

3)  चालु आर्थिक वर्षाची कर भरल्याची पावती

4 ) मनपाची नाव बदल फी

22) मिळकतीच्या हस्तांतरणाची कार्यवाही किती दिवसात पूर्ण केली जाते ?

उत्तर : 15 दिवस

23) मिळकतीचा उतारा कुठे मिळेल ?

उत्तर :

त्या त्या विभागिय कार्यालयात

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490, 2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6 ) विभागीय कार्यालय नाशिक सातपुर – 2354786

24) मिळकतधारकाची थकबाकी नसल्याचा दाखला कुठे मिळेल?

उत्तर :

त्या त्या विभागिय कार्यालयात

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490, 2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6 ) विभागीय कार्यालय नाशिक सातपुर – 2354786

25) आकारणी मध्ये बदल करावयाचे झाल्यास कुठे अर्ज करावा ?

उत्तर :

त्या त्या विभागिय कार्यालयात

विभागीय कार्यालयाचे नाव

1)  विभागीय कार्यालय नाशिक पुर्व – 2597982

2)  विभागीय कार्यालय नाशिक पश्चिम – 2582348

3)  विभागीय कार्यालय पंचवटी – 2513490, 2512353

4)  विभागीय कार्यालय नाशिक रोड – 2465798

5)  विभागीय कार्यालय नविन नाशिक – 2390768

6 ) विभागीय कार्यालय नाशिक सातपुर – 2354786

26) आकारणी बदलाबाबत आवश्यक कागदपत्रे कोणती ?

उत्तर :

1)  मिळकत उतारा

2 ) वापराबाबतचा पुरावा (लाईट बिल)

27) मिळकतधारकाच्या नाव/ पत्ता दुरूस्ती बाबत काय पुरावे दयावे?

उत्तर :

1)  आयडी प्रुफ

2)  लाईट बिल

3)  मिळकत उतारा

4)  चालु आर्थिक वर्षातील कर भरलेची पावती

5 ) खरेदीखताची प्रत

28) अनाधिकृत आकारणी असेल तर बंद करणेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ?

उत्तर :

अर्जासोबत

1)  बांधकाम पुर्णत्वाचा दाखला

2 ) दाखला नसल्यास दहा वर्षे दंडात्मक दराने कर भरणा केल्याच्या पावत्या सादर कराव्यात.

29) मिळकत भरणा करणेकामी बाहेर गांवचे चेक स्विकारले जातात काय?

उत्तर : होय स्विकारले जातात.