Frequently Asked Questions - Local Body Tax
Quick Search

1) नोंदणी कोणी करावी ?

उत्तर : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियमाचे नियम 3 नुसार व्यापारी जो आयात करणारा असेल आणि त्यांनी वर्षभरात आयात केलेल्या मालाचे मुल्य र.रू. 1,00,000/- पेक्षा कमी नाही किंवा कोणत्याही बाबतीत उक्त नियमाचे खंड (क) अन्वये एखादा व्यापारी स्थानिक संस्था कर भरण्यास पात्र झालेला नसेल आणि त्याच्या सर्व खरेदी किंवा विक्रीची उलाढाल वर्षभरात र.रू.5,00,000/- पेक्षा कमी नाही अशा व्यापाऱ्यांने स्थानिक संस्था कराची नोंदणी करणे आवश्यक आहे.

2) 1 एप्रिल 2013 पुर्वीच्या वर्षामध्ये ज्या व्यापा-याने आयात केलेल्या मालाचे मुल्य एक लाखापेक्षा कमी आहे, व त्याची खरेदी व विक्री उलाढाल 5 लाखापेक्षा कमी आहे, परंतु 1 एप्रिल 2013 नंतर जर तो या नियमान्वये नोंदणीस पात्र असेल अशावेळी त्याने नोंदणी करणे आवश्यक आहे काय?

उत्तर : होय.

3) धंद्याच्या व्यवस्थापकाचे नाव व्यापा-याने जाहिर करणे आवश्यक आहे काय?

उत्तर : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियमाचे नियम १८ मधील तरतुदीनुसार व्यापाऱ्याने धंद्याच्या व्यवस्थापकाचे नाव जाहीर करणे आवश्यक आहे व त्याकरीता त्यांने "च" नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

4) एखाद्या व्यापा-याने नोंदणी न करता व्यापार चालू ठेवला असेल अशा वेळी काय कारवाई होऊ शकेल ?

उत्तर : नोंदणी न करता व्यवसाय करीत असल्याचे तपासणीत आढळून आल्यास अशा व्यापाऱ्या विरूध्द महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियमाचे नियम 48 मधील तरतुदीनुसार ज्या कालावधीकरीता नोंदणी न करता धंदा चालविला असेल त्या कालावधीकरीता व्यापाऱ्याकडून प्रदेय असलेल्या स्थानिक संस्था कराच्या रक्कमेचा पाचपटीहून अधिक नसेल इतक्या रक्कमेच्या शास्तीस पात्र असेल.

5) एखाद्या व्यापा-याने त्याचा व्यवसाय हस्तांतरीत केला असेल आणि जर त्याच्याकडे स्थानिक संस्था कराची बाकी असेल अशा वेळी स्थानिक संस्था कर कोण भरेल ?

उत्तर : महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियमाचे नियम 5 (5) नूसार – त्या परिणामी अन्य कोणतीही व्यक्ती त्याच्या धंद्याची किंवा धंद्याच्या भागाची उत्तराधिकारी झालेली आहे त्याबाबतीत तो व्यापारी व व्यक्ती जिच्याकडे धंदा हस्तांतरीत केला आहे किंवा यथास्थित, जिच्याकडे धंदा हस्तांतरीत केला आहे अशी उत्तराधिकारी, या नियमान्वये व्यापाऱ्याकडून देय असलेले कोणतेही व्याज, शास्ती व जप्त केलेली रक्कम यासह असे हस्तांतरण, विल्हेवाट किंवा बदल होण्याच्या वेळेपर्यंत, स्थानिक संस्था कर भरण्यास संयुक्तपणे व पृथकपणे पात्र असतील. मग असे हस्तांतरण, विल्हेवाट किंवा बदल होण्यापुर्वी कोणतीही शास्ती व व्याज यासह अशा स्थानिक संस्था कराचे निर्धारण केलेले असो किंवा नसो किंवा परिमाण ठरविलेले असो किंवा नसो. परंतु त्यानंतर भरावयाचे किंवा निर्धारण करावायचे अथवा  परिमाण ठरवावयाचे राहुन गेलेले असो किंवा नसो.

6) एखाद्या व्यापा-याची एकाच नावाने व्यवसायाची ठिकाणे एकापेक्षा जास्त असतील तर नोंदणीसाठी किती अर्ज करावेत ?

उत्तर : प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र नोंदणी करू शकतो किंवा एका अर्जामध्ये अतिरीक्त व्यवसायाचे ठिकाण दर्शवून एकाच नोंदणी क्रमांकाअंतर्गत सर्व व्यवसायांचा कर भरू शकतो.

7) नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरीत करता येईल काय ?

उत्तर : नाही.

8) नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आयुक्त यांना कळविणे आवश्यक आहे काय ?

उत्तर : होय.

9) नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे/झाल्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या दिनांकापुर्वी जर त्या व्यावसायिकाकडे स्थानिक संस्था कर/दंड/व्याज इ. ची रक्कम बाकी असेल अशा वेळी अशी रक्कम कोण भरेल?

उत्तर : सदरची रक्कम नोंदणीधारकाकडून पुर्ण वसूल झाल्यानंतरच नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जाईल.

10) धंद्यामध्ये/व्यवसायामध्ये काही बदल करावयाचा झाल्यास काय करावे?

उत्तर : धंद्यामध्ये / व्यवसायामध्ये काही बदल करावयाचा झाल्यास त्याची सूचना आयुक्तास लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे व त्याप्रमाणे त्याची नोंद नोंद्णी प्रमाणपत्रामध्ये करुन घेणे आवश्यक आहे.

11) एखाद्या व्यापा-याने धंद्याच्या नावामध्ये बदल केला असेल किंवा जर ती भागीदारी संस्था असेल आणि तिचे विसर्जन न करता रचनेत बदल केला असेल किंवा तो विश्र्वस्त व्यवस्थेचा विश्र्वस्त असेल आणि त्या विश्र्वस्तामध्ये बदल झाला असेल किंवा तो पाल्याचा पालक असेल व पालकामध्ये बदल झाला असेल तर अशा वेळी परत नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता आहे काय?

उत्तर : अशावेळी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु झालेल्या बदलाबाबतची सुचना नियम १६ मधील तरतुदीनुसार लिखीत स्वरूपात आयुक्त/उपआयुकतास कळविणे आवश्यक आहे.

12) एखाद्या नोंदणीकृत व्यापा-याने शहरातील इतर व्यापा-यांकडून करयोग्य माल खरेदी केला असेल अशावेळी माल खरेदी करणा-या व्यापा-याने काय करावे ?

उत्तर : माल खरेदी करतांना समोरच्या व्यापाऱ्याकडून टॅक्स इन्व्हाईस घ्यावे व त्यावर त्या व्यापाऱ्याचा एलबीटी नंबर व त्याचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

13) मनपा क्षेत्रामध्ये व्यवसाय करणा-या व्यावसायिकाने मनपा क्षेत्रातील कोणत्याही इतर व्यावसायिकास माल विकला असेल तर याबाबत विक्री करणा-या व्यापा-याने काय करावे ?

उत्तर : विक्री करण्याऱ्या व्यवसायीकास त्या मालाचे टॅक्स इन्व्हाईस देउन त्यावर त्याचा एलबीटी नंबर व तसे प्रमाणपत्र द्यावे.

14) विनापरवाना हॉस्पिटल, दवाखाने, मॅटर्निटी होम चालविता येतात का ?

उत्तर : विनापरवाना हॉस्पिटल, दवाखाने, मॅटर्निटी होम चालविता येत नाही.

15) रास्त बाजार मूल्य निर्धारित करण्याचे अधिकार आयुक्त यांना आहेत काय ?

उत्तर :

होय.

महाराष्ट्र महानरगपालिका (स्थानिक संस्था कर ) नियमाचे नियम 25 अन्वये रास्त बाजार मुल्य निर्धारीत करण्याचे अधिकार आयुक्त/उपआयुक्त यांना आहेत.

16) मनपा हद्दीमध्ये विक्री / उपभोग / उपयोग या कारणांसाठी कोणत्याही व्यापा-याने किंवा व्यक्तीने अशा मालाची विक्री किंवा खरेदीची किंमत निश्चित केलेली नसेल किंवा असा माल विक्री किंवा खरेदीद्वारे मिळविलेला नसेल अशा मालाच्या बाबत त्या मालाची किंमत निश्चित करता येऊ शकेल काय ?

उत्तर : रास्त बाजार मुल्यनुसार निश्चित करता येउ शकेल.

17) विवरण पत्र सादर करण्याच्या पध्दती कोणत्या आहेत ?

उत्तर : उक्त नियमाचे नियम २९ मधील तरतुदीनुसार विहित  नमुन्यातील ई-2 मध्ये वार्षिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

18) स्थानिक संस्था कराची विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत किती ?

उत्तर : आर्थिक वर्ष संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत वार्षिक विवरणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.

19) एखाद्या व्यापा-याने जाणूनबुजून चुकीची , खोटी परताव्याची मागणी केल्यास अशावेळी काय तरतुद आहे ?

उत्तर : महाराष्ट्र महानरगपालिका (स्थानिक संस्था कर) नियमाचे नियम 48 मधील तरतुदीनूसार आयुक्त संबंधीत व्यापाऱ्यास त्याचे म्हणणे मांडणेसाठी वाजवी संधी दिल्यानंतर शास्ती लादू शकतात.

20) स्थानिक संस्था कराच्या सॉफ्टवेअरमध्ये सध्या कोणत्या सुविधा सुरू आहेत?

उत्तर : सदरचा प्रश्न हेल्पलाईन कक्षा बाहेरचा आहे.

21) स्थानिक संस्था कराची रक्कम केव्हा भरावी ?

उत्तर : प्रत्येक महिन्यात महानगरपालिका हद्दीबाहेरून आयात केलेल्या करपात्र मालाचा स्थानिक संस्था कराची रक्कम पुढील महिन्याच्या 20 तारखेला किंवा त्यापुर्वी भरणे आवश्यक आहे.

22) प्रत्येक व्यवसायिकांची स्थानिक संस्था कर करीता नोंदणी करणे बंधनकारक आहे का ?

उत्तर :

नाही.

परंतु जो व्यावसायिक स्थानिक संस्था कराचे नियम 3 मध्ये नमूद केल्यानुसार नोंदणीस पात्र असेल अशा व्यावसायीकाने नोंदणी आवश्यक आहे.

23) व्यवसायाची नोंदणी करण्याकरीता अर्ज कोठे मिळेल ?

उत्तर : स्थानिक संस्था कर मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक व www.nashikcorporation.in या संकेतस्थळावर उपलब्ध होउ शकेल.

24) व्यवसाय अर्जाची किंमत काय ?

उत्तर :

अर्ज निशुल्क आहे.

परंतु स्थानिक संस्था कराचे नियम 9 नूसार नोंदणी शुल्क प्रत्येक नोंदणीधारकास र.रू. 100/- इतका आहे.

25) व्यवसाय अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावित ?

उत्तर : विहित नमुना अर्जासोबत त्याची यादी जोडलेली आहे. तसेच व्यवसायाचे स्वरूप विचारात घेउन आवश्यक ती कागदपत्रे.

26) भरलेला अर्ज कोठे जमा करावा ?

उत्तर : स्थानिक संस्था कर मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक

27) परिपुर्ण अर्ज सादर केले नंतर किती दिवसांत नोंदणी क्रमांक व प्रमाणपत्र मिळते ?

उत्तर : नोंदणी क्रमांक एक ते तीन दिवसात दिला जातो. परंतु प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक दिल्यानंतर शक्य झाल्यास 15 दिवसापर्यंत दिले जाते.

28) केलेली नोंदणी किती कालावधी करीता वैध आहे ?

उत्तर : व्यवसाय अस्तित्वात असेपर्यंत/ नोंदणी रद्द होईपावेतो.

29) नोंदणीचे नुतनीकरण करावे लागते का ?

उत्तर : सध्याच्या नियमात तशी तरतुद नाही.

30) बांधकाम व्यवसायिक तसेच स्वत:साठी घर बांधणा-यांकरीता स्थानिक संस्था कर नोंदणी आवश्यक आहे का ?

उत्तर : होय.

31) असल्यास अर्जासोबत कोणती कागदपत्रे सादर करावित ?

उत्तर : विहित नमुना अर्जासोबत त्याची यादी जोडलेली आहे. तसेच व्यवसायाचे स्वरूप विचारात घेउन आवश्यक ती कागदपत्रे.

32) स्थानिक संस्था कर कुठे भरावा ?

उत्तर :

नाशिक महानगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या खालील बँकेच्या नाशिक मनपा हद्दीतील कोणत्याही शाखेत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मनपाच्या खाते क्रमांकावर विहित नमुन्यातील चलनाव्दारे स्थानिक संस्था कर भरावा.

1)  एच.डी.एफ.सी. बँक : 12467630000090

2 ) बँक ऑफ महाराष्ट्र : 60133858915

33) स्थानिक संस्था कर दरमहा भरणे आवश्यक आहे का ?

उत्तर : होय.

34) स्थानिक संस्था कर भरण्याची अंतिम मुदत काय असते ?

उत्तर : प्रत्येक महिन्यात महानगरपालिका हद्दीबाहेरून आयात केलेल्या करपात्र मालाचा स्थानिक संस्था कराची रक्कम पुढील महिन्याच्या 20 तारखेला किंवा त्यापुर्वी भरणे आवश्यक आहे.

35) स्थानिक संस्था कर वेळेत भरला नाही तर कीती दंड अथवा विलंब शुल्क भरावे लागतील ?

उत्तर : स्थानिक संस्था कर विहित मुदतीत न भरल्यास त्या त्या महिन्याच्या प्रदेय असलेल्या स्थानिक संस्था कर रक्कमेवर दरमहा 2 टक्के व्याजासह रक्कम भरणे आवश्यक आहे. परंतु विवरणपत्रक सादर केल्यानंतर विवरणपत्रकाच्या पडताळ्णी व तपासणीमध्ये स्थानिक संस्था कर वेळेत भरला नसल्याचे आढळुन आल्यास प्रदेय होणारा स्थानिक संस्था कर अधिक नियमानुसार होणारे व्याज व शास्ती लादली जाते.

36) स्थानिक संस्था कर धनादेश, पे ऑर्डर कोणाच्या नावे काढावी ?

उत्तर :

नाशिक महानगरपालिका, नाशिक एलबीटी

Nashik Municipal Corporation – LBT

37) स्थानिक संस्था करामध्ये सवलत मिळावी यासाठीच्या काहि योजना आहेत का ?

उत्तर : नाही.

38) मुदतीत विवरणपत्रक सादर न केल्यास शास्ती लागु आहे का?

उत्तर :

होय.

उक्त नियमाचे नियम ४८ (६) मधील तरतुदीनुसार व्यापारी किंवा व्यक्तीला त्यांचे म्हणणे मांड्ण्याची वाजवी संधी दिल्यानंतर र.रु. ५,०००/- पेक्षा जास्त नसेल एवढी रक्कम शास्ती म्हणुन लादता येते.

39) अभय योजना अंतर्गत दंड आणि व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे का?

उत्तर : होय, पण जर भोगवट दाराने दि. ३१-०७-२०१५ च्या आत आपल्या व्यापाराची संपुर्ण LBT ची रक्कम भरली असल्यास अशा व्यापा-याला दंड आणि व्याजची रक्कम माफ केली जाईल.